Cancer Screening
sakal
नाशिक: कर्करोगाचा (कॅन्सर) धोका सातत्याने वाढत असताना आजही ५५ ते ६० टक्के रुग्ण आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करत असल्याचे दिसून येते. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत.