एसएनडी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना महिंद्रात नोकरीसाठी निवड बाभूळगाव : कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळविले यश; वार्षिक ४.२० लाखांचे पॅकेज

एसएनडी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना महिंद्रात नोकरीसाठी निवड बाभूळगाव : कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळविले यश; वार्षिक ४.२० लाखांचे पॅकेज
Published on: 
एसएनडीच्या चौघांना महिंद्रात नोकरी बाभूळगाव : कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड, वार्षिक ४.२० लाखांचे पॅकेज सकाळ वृत्तसेवा येवला, ता.९ : उद्योगविश्वात यशाची भरारी घेण्यासाठी केवळ पदवी नव्हे, तर दर्जेदार तांत्रिक ज्ञान, कौशल्य आणि योग्य मार्गदर्शनाची जोड आवश्यक असते, याचा प्रत्यय बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित उद्योगसमूहात कॅम्पस प्लेसमेंटद्वारे महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांनी नोकरीची संधी मिळविली आहे. प्रत्येकी वार्षिक ४.२० लाख रुपयांचे पॅकेज मिळवून त्यांनी गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. बाभूळगाव येथील एस.एन.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची आणि तांत्रिक कौशल्याची छाप उमटवत महिंद्रा अँड महिंद्रा, इगतपुरी येथील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रितेश जाधव, किरण जंगम, योगेश पानसरे आणि शुभम कोतकर या चार विद्यार्थ्यांची कंपनीत निवड झाली असून, त्यांना वार्षिक ४.२० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,कार्यकारी संचालक रुपेश दराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक पाटील, रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय क्षीरसागर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरजीत पवार तसेच मेकॅनिकल विभागाचे प्लेसमेंट समन्वयक ऋषिकेश निळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com