धुळे : टुडे पान २ साठी..
--
धुळ्यात एसएनडीटी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा
--
विविध क्रीडा प्रकारांमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : मुंबईस्थित एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई व देवपूर येथील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित, कला वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे सीनियर आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धां नुकत्याच झाल्या. या क्रीडा महोत्सवात अथलेटिक्स, तायकांडो आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
स्पर्धेत १०० मीटर धावण्यात रूपाली पाटील (मुंबई) प्रथम, चयना शाह (मुंबई) द्वितीय, हर्षल मानकर (मुंबई) तृतीय; ४०० मीटर धावण्यात श्वेता महाजन (सांगली) प्रथम, अर्चना निकाले (चाळीसगाव) द्वितीय, नम्रता वरंदळ तृतीय, ८०० मीटर धावण्यात अदिती पाटील (वज्रेश्वरी) प्रथम, इशा जाधव (सातारा) द्वितीय, अर्चना निकाले (चाळीसगाव) तृतीय; ५००० मीटर धावण्यात अदिती पाटील (वज्रेश्वरी) प्रथम, प्रमिला कोळी (सांगली) द्वितीय, मनीषा लोखंडे (टिटवे) तृतीय, गोळाफेकमध्ये अनुष्का शिंदे (पुणे) प्रथम, तनवी अंधारे (मुंबई) द्वितीय, स्नेहल जाधव (चाळीसगाव) तृतीय, भालाफेकमध्ये दिशा इंगळे (पुणे) प्रथम, कीर्ती सोलनपुरकर (सांगली) द्वितीय, शोभा घेरडे (सांगली) तृतीय, लांब उडीमध्ये साक्षी माळी (सांगली) प्रथम, मिताली बुरटे (सातारा) द्वितीय, निकिता पाटील (टिटवे) तृतीय, तर रिले स्पर्धेत सी. बी. शाह महिला महाविद्यालय संघ (सांगली) प्रथम, एम एम पी शाह महिला महाविद्यालय संघ (मुंबई) द्वितीय, कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय संघ (मुंबई) तृतीय क्रमांकावर राहिल्या. कला वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालयातील प्राचार्य, संस्थेतील पदाधिकारी, शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.