नाशिक- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या संसाराला हातभार लागावा, यासाठी शासनातर्फे ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. तीन वर्षांपासून प्रलंबित अनुदान विभागास प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील ४७८ लाभार्थ्यांच्या खात्यावर ते वर्ग करण्यात आले. .जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जाते. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी दोन कोटी ३९ लाख रुपये निधी प्राप्त झाला. फेब्रुवारीत प्रत्येक लाभार्थ्याला ५० हजारांप्रमाणे एकूण ४७८ लाभार्थ्यांना थेट त्यांच्या संयुक्त बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले. या योजनेंतर्गत २०२२-२३ मधील १०९, २०२३-२४ मधील २४६ आणि २०२४-२५ मधील १२५ लाभार्थ्यांचा समावेश आहे.२०१० पर्यंत अशा जोडप्यांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन ५० हजार रुपये करण्यात आले आहे. .जिल्हा परिषदेकडे ऑगस्ट २०२३ मध्ये शासनाकडून २९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ५८ जोडप्यांना लाभ देण्यात आला होता. २०२२-२३ मध्ये १०९, २०२३-२४ मध्ये २४६ आणि २०२४-२५ जानेवारीपर्यंत १३० असे एकूण ४८५ प्रस्ताव प्रलंबित होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी २३९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. दरम्यान, पात्र व्यक्तींनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी केले आहे..Chiplun Crime : बुडणाऱ्या लेकराला वाचवताना आईसह आत्याचा दुर्दैवी मृत्यू; वाशिष्ठी नदीचा डोह ठरला काळ, कपडे धुण्यासाठी गेले अन्...अशी असते प्रक्रियाप्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे आलेल्या प्रस्तावाची छाननी होते. कागदपत्रे तपासली जातात. जोडप्यांकडून संयुक्त बँक खाते, पासबुक, ओळखपत्र आदींची पडताळणी केली जाते. कागदपत्रांची सत्यता तपासल्यावर निधी खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे जमा होतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.