Sola Somvar Vrat: निज श्रावणात सोळा सोमवार व्रत प्रारंभ! अधिक मासात व्रतास निर्बंध, 14 वर्ष केले जाते व्रत

Sola Somvar Vrat
Sola Somvar Vratesakal

Sola Somvar Vrat : मनोभावे सोळा सोमवार व्रत केल्याने शंभू महादेव इच्छा पूर्ण करतात अशी धारणा भाविकांमध्ये आहे. त्यामुळे सोळा सोमवार व्रताची नेमकी सुरवात कधी करावी? असा प्रश्‍न अधिक मासाच्यानिमित्ताने तयार झाले आहे.

त्याच अनुषंगाने धर्मशास्त्राचे अभ्यासक महंत सुधीरदास महाराज पुजारी यांनी निज श्रावणात म्हणजे, १७ जुलैला आषाढ संपत असल्याने निज श्रावणात व्रताला सुरवात करावी, असे म्हटले आहे. (Solah Somvar Vrat starts in Nij Shravan Restrictions on fasting in more months fasting done for 14 years nashik)

महंत सुधीरदास म्हणाले, की चंद्र पंचांग आणि सूर्य पंचांगाचा एकत्र विचार केला जात असल्याने तिथी-वार मागे-पुढे होत नाहीत. कालगणना सारखी राहते.

श्रावणाच्या आरंभापासून सोळा सोमवार व्रताला सुरवात करणे आवश्‍यक आहे. अधिक मासात व्रताला सुरवात केली जात नाही. सोळा सोमवार व्रत हे १४ वर्षे केले जाते.

व्रत महिला अथवा पुरुषांनी करावे अशी मर्यादा नाही. उलटपक्षी मनाने व शरीराने शुद्ध असावे असे सोळा सोमवार व्रतासाठी मानले जाते. सोळा सोमवार व्रत केल्यानंतर सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन केले जाते.

सतराव्या सोमवारी उद्यपान नाही जमल्यास कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारी उद्यापन करता येते. व्रतामध्ये दिवसभर उपवास केला जातो. शारीरिकदृष्ट्या दिवसभर उपवास करणे शक्य होत नसल्यास गहू, गूळ आणि तुपाचे शिरा, खीर असे पदार्थ खालले तरी चालतात.

सायंकाळी भाविकांनी स्नान करुन शंभू महादेवांची मूर्ती अथवा बेलाच्या पानांच्या प्रतिकृतीची पूजा केली जाते. सोळा सोमवारच्या कथेचे अथवा माहात्म्याचे वाचन केले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sola Somvar Vrat
Shravan 2023 : यंदाचा श्रावण आहे खास! काय करावं अन् काय करू नये? जाणून घ्या

तदनंतर शिवस्तुती रुपी आरती केली जाते. मग कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटप केला जातो. अशा पद्धतीने सलग सोळा सोमवार व्रत करण्याची परंपरा पाळली जाते.

उद्यापनाला प्रसाद म्हणून कणकेचा चुरमा असतो. स्वच्छ पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे, अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचा गंध, अक्षता, धूप-दीप, कापूर, पानं-सुपारी, फळं, बेलाची १०८ अथवा एक हजार ८ पानं, नैवेद्य याचा उद्यपनाच्या साहित्यात समावेश असतो.

मंदिरात शंभू महादेवाची पूजा-आर्च्या केल्यावर प्रार्थना करत प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिराखेरीज घरामध्ये शंभू महादेवांची षोडशोपचार पूजन केले जाते.

नैवेद्य अन प्रसादाचा चुरमा

गव्हाच्या तुपामध्ये तळलेले पीठ कुसकरले जाते. त्यात गूळ आणि तुप घालून चुरमा बनवला जातो. त्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. मात्र उपवास सोडताना आहारात मीठ खाण्यात वापरले जात नाही.

Sola Somvar Vrat
Shravan: ‘अधिक श्रावणा’चा यंदा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग! उपवास व विष्णूला प्रिय विधी करण्यास धार्मिक महत्त्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com