सौर ग्राहकांना चुकीच्या बिलांचा झटका

सौर ग्राहकांना चुकीच्या बिलांचा झटका
Published on: 
टुडे पान २ : मेन फिचर --- (घरावरील सोलर व वीजबिलाचा एआय फोटो वापरावा) ---- सौर ग्राहकांना चुकीच्या बिलांचा झटका ‘महावितरण’च्या कार्यालयात संताप; मागील महिन्यात ७० तक्रारी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीजबिलाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांनाच आता महावितरणच्या चुकीच्या बिलिंगचा फटका बसत आहे. शहरातील सौर मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करणाऱ्या एजन्सीने गेल्या चार-पाच महिन्यांपासून रीडिंग घेणे बंद केल्याने अनेक सौर ग्राहकांना गेल्या तीन महिन्यांपासून अव्वाच्या सव्वा वीजबिले येत आहेत. बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारूनही तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सौर ग्राहकांच्या बिलिंगमध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन या तिन्ही रीडिंगची अचूक नोंद होणे आवश्यक असते. मात्र, काही ग्राहकांचे एक-दोन महिन्यांचे एक्सपोर्ट रीडिंग न घेता केवळ इम्पोर्ट रीडिंग नोंदविल्याने चुकीची बिले तयार होत असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित रीडिंग न घेता सरासरी बिल देणे आणि त्यानंतर वर्षभराचे किंवा दीड वर्षाचे रीडिंग एकत्र करून मोठे बिल देण्याचे प्रकारही समोर आले आहेत. तर आर्थिक फटका... दरम्यान, जुन्या सौर नेट मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविताना आणखी एक गंभीर बाब ग्राहकांच्या निदर्शनास आली आहे. स्मार्ट मीटरमध्ये ‘नेट मोड’ सक्रिय नसून ‘फॉरवर्ड मोड’ राहिल्यास एक्सपोर्टची योग्य नोंद होत नाही. परिणामी, ग्राहकाने सौरऊर्जेतून निर्माण करून वीज वाहिनीत पाठविलेली वीजही इम्पोर्ट म्हणून मोजली जाण्याची शक्यता असून, त्याचा थेट आर्थिक फटका ग्राहकाला बसतो. नॉन-स्मार्ट मीटर ‘रामभरोसे’ शहरातील जुन्या नॉन-स्मार्ट मीटरचे नियमित रीडिंग घेण्याची व्यवस्था पुरेशी प्रभावी नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष मीटर रीडिंगऐवजी सरासरी बिल दिले जात असल्याचे ग्राहकांच्या तक्रारी येत आहे. जुन्या मीटरचेही नियमित आणि प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. मीटर बदलताना ही घ्या दक्षता... - स्मार्ट मीटर बसविताना जुन्या मीटरच्या रीडिंगचा फोटो काढून ठेवा. - नवीन मीटरचा क्रमांक वीजबिलाशी जुळतो का, याची तपासणी करावी - नवीन मीटरमध्ये ‘नेट मोड’ सक्रिय आहे की नाही, याची खात्री करूनच मीटर बदलून घ्या. चुकीचे बिल आल्यास... - मीटरवरील इम्पोर्ट-एक्सपोर्ट रीडिंगचा फोटो घ्यावा. - जुन्या व नवीन मीटरचे रीडिंग व क्रमांक जतन करावा. - महावितरणकडे तातडीने लेखी अथवा ऑनलाइन तक्रार नोंदवावी. - तक्रारीचा क्रमांक व बिलाच्या प्रती जतन कराव्यात. - सुधारित बिल मिळेपर्यंत तक्रारीचा पाठपुरावा करावा. - चुकीच्या बिलावर कारवाई होण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोट.. सौर प्रकल्प ग्राहकांचे रीडिंग घेण्याचे काम संबंधित एजन्सींकडून सुरू आहे. मागील महिन्यात काही सौर उर्जा ग्राहकांच्या तयार झालेल्या विजेच्या नोंदीबाबत अडचणी आल्या होत्या. त्या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. - गोपाल महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com