Solar Eclipse 2022 : खगोलप्रेमींनी अनुभवला ग्रहणाचा थरार

Solar Eclipse
Solar Eclipseesakal
Updated on

नाशिक : देशातील मोजक्‍याच शहरांतून सूर्यग्रहण दिसणार असल्‍याची चर्चा असल्‍याने खगोलप्रेमींची उत्‍सुकता शिगेला पोचलेली होती. अशात मंगळवारी (ता.२५) नाशिकमधील विविध ठिकाणाहून खगोलप्रेमींनी खंडग्रास सूर्यग्रहणाचा थरार अनुभवला. डोळ्यांना इजा होण्याचा धोका लक्षात घेता, सर्व आवश्‍यक सावधगिरी बाळगून सूर्यग्रहणाची अनुभूती घेण्यात आली. (Solar Eclipse 2022 nashik people experience thrill of Solar eclipse Nashik News)

Solar Eclipse
Nashik: ‘फिट्स’ च्या आजारावर केला जातो विनामूल्य उपचार; औषध घेण्यासाठी रूग्णांची गर्दी

या वर्षीचा दुसरा व अखेरचा सूर्यग्रहण असल्‍याने खगोलप्रेमींमध्ये उत्‍सुकता लागून होती. परंतु ग्रहण दिसण्याबाबत अनिश्‍चितता असल्‍याने, खगोलप्रेमींकडून इमारतीच्‍या गच्चीवर, उंच ठिकाणी दुपारपासूनच ठाण मांडला होता. सूर्यग्रहण पाहण्यासाठी आवश्‍यक सर्व उपाययोजना करून ठेवलेल्‍या होत्‍या. यात प्रामुख्याने एक्‍सरे, विशेष असे काळ्या रंगाचे गॉगल स्‍वत:सोबत बाळगले होते. डोळ्यांना इजा होण्याचा धोका लक्षात घेता, तज्‍ज्ञांनी खगोलप्रेमींना आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या. ग्रहण काळात या खगोलीय घटनेचा थरार अनुभवण्यासाठी उपस्‍थितांची धडपड बघायला मिळाली. अखेर काही मिनिटांसाठी या खगोलीय घडामोडीचे साक्षीदार खगोलप्रेमी झाले.

२५ टक्क्यांपर्यंत झाकोळला सूर्य

ग्रहण काळात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत सूर्य झाकोळल्‍याचे चित्र नाशिककरांना बघायला मिळाल्‍याचे खगोलशास्‍त्राच्‍या तज्‍ज्ञांनी सांगितले. काही मिनिटांसाठी तरी ग्रहणाचा थरार अनुभवता आल्‍याने खगोलप्रेमींमध्ये उत्‍साह निर्माण झाल्‍याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले.

Solar Eclipse
Nashik : घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; 2 तोळे सोन्याची पोत केली परत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com