कापडणे दिवाळीचा खर्च टाळून

कापडणे दिवाळीचा खर्च टाळून
Published on: 
KPD26B13622 कापडणे : मैदानावरील सोलर हायमास्ट दिव्यांचे उद्‌घाटन करताना मान्यवर. -------- पोलिस भरतीच्या तरुणांसाठी मैदानात सोलर हायमास्ट दिवे योगेश पाटील : दिवाळीचा खर्च टाळून युवकांसाठी विधायक पाऊल सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ९ : येथील युवा उद्योजक योगेश पाटील यांनी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी येथील मैदानात सोलर हायमास्ट दिवे बसविले. युवा उद्योजक पाटील यांनी दिवाळीचा इतर खर्च टाळून ऐन दिवाळीत युवकांसोबत दिवाळी साजरी करत हा उपक्रम राबवला. सामाजिक कार्यकर्ते हिंमत बोरसे यांच्या हस्ते या दिव्यांचे उद्‌घाटन झाले. या वेळी योगीनाथ महाराज, पंचायत समितीचे माजी सदस्य नवल पाटील, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. युवा उद्योजक पाटील यांनी सांगितले, पोलिस व सैन्य भरतीसाठी तयारी करणारे तरुण पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत मैदानात सराव करतात. मैदानात पुरेसा प्रकाश नसल्याने त्यांना सराव करताना अडचणी येत होत्या. अंधारामुळे धावणे, मैदानी चाचणीचा सराव करणे अवघड होत होते. ही अडचण लक्षात घेऊन मैदानात सोलरवर चालणारे हायमास्ट दिवे लावण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, दिवाळीच्या सणाला नवीन कपडे, फटाके यापेक्षा युवकांच्या भविष्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी करावे, या भावनेतून हा उपक्रम राबविला. दिवाळीच्या दिवशीच मैदान प्रकाशमय झाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आता पहाटे साडेचारपासून ते रात्री उशिरापर्यंत तरुणांना निर्भयपणे सराव करता येणार आहे. हिंमत बोरसे म्हणाले, पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे. ग्रामीण भागातील युवकांना शहरासारख्या सुविधा मिळाव्यात यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. तरुणांनी या सुविधेचा योग्य वापर करून गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले. योगीनाथ महाराज, प्रा. पाटील यांनी विधायक उपक्रमाचे कौतुक केले. --------- जिजाबराव गुरूजी मैदान पोलिस भरती व सैन्यदलात भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांसाठी बोरसे परिवार त्यांची शेती विशिष्ट कालावधीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या मैदानाला आदर्श शिक्षक (कै.) जिजाबराव बोरसे सराव मैदान असे नामकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.