सिडको- सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३४७ प्रकरणांवर कारवाई करत एकूण १५, ५३, ४६० रुपये दंड आकारला आहे..अहवालानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये सर्वाधिक ३२ प्रकरणांमध्ये १, ३५, ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यानंतर जानेवारीमध्ये ६२ प्रकरणांमध्ये २,९४,००० रुपये, जून २०२४ मध्ये ३१ प्रकरणांवर २, ७६,८०० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच, ऑगस्ट २०२४ मध्ये १७ प्रकरणांवर १,०४,८०० रुपये, डिसेंबर २०२४ मध्ये १५ प्रकरणांवर ३८,८०० रुपये, तर नोव्हेंबर २०२४ मध्ये ५ प्रकरणांवर ६,२०० रुपये आदी महिन्यात दंड करण्यात आला आहे. .महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी कचरा वर्गीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक व्यापारी, संस्था आणि निवासी सोसायट्या हे नियम पाळत नसल्याचे आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली..महापालिकेकडून वारंवार सूचना देऊनही कचरा वर्गीकरण न करणाऱ्या आणि कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका कठोर पावले उचलत आहे. यापुढेही कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. .शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या नियमांचे पालन केल्यास दंडात्मक कारवाई टाळता येऊ शकते. कचरा व्यवस्थापनाचे नियम मोडणाऱ्या संस्था, व्यापारी आणि सोसायट्यांनी लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.