NMC News : घनकचरा विभागाची स्वच्छ सर्वेक्षणात कसोटी; महापालिकेकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

NMC
NMCesakal

NMC News : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरवात झाली आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार पहिल्या दहा शहरांमध्ये नामांकन मिळविण्यासाठी महापालिकेने तयारी केली असून, त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय सेवेत राज्यात नाशिकला पहिला क्रमांक मिळाल्याने आता स्वच्छ भारत अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची कसोटी लागणार आहे. (Solid waste department tested in clean survey Appointment of officers by nmc nashik news)

देशात पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवण्याची नाशिक महापालिकेची धडपड सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत यश मिळाले नाही. २०१६ मध्ये या स्पर्धेत देशातील ७३ शहरांनी सहभाग नोंदवला होता.

त्यात नाशिकचा क्रमांक ३७ वा होता. २०१७ मध्ये मात्र ४३४ शहरे सहभागी झाल्याने नाशिक १५१ व्या स्थानी होते. तर, २०१८ मध्ये ४ हजार २०३ शहरांच्या स्पर्धेतही नाशिकने ६३ वे स्थान मिळविले. २०१९ मध्ये शहरांची संख्या वाढून चार हजार २३७ झाली.

यात नाशिकचा ६७ वा क्रमांक आला. २०२० मध्ये ४ हजार २४२ शहरांच्या स्पर्धेत नाशिकने चांगली कामगिरी करत अकराव्या स्थानापर्यंत मजल मारली. त्यानंतर २०२१ मध्ये सतराव्या, तर २०२२ मध्ये २० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती (कंसात प्रभाग क्रमांक)

शहर अभियंता नितीन वंजारी (प्रभाग २२), अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी (१९), अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके (१२), वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे (दोन), उपमुख्यलेखा परीक्षक प्रतिभा मोरे (सतरा), कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर (२३), कार्यकारी अभियंता बाजीराव माळी (चौदा),

सचिन जाधव (दहा व अकरा), जितेंद्र पाटोळे (२८ व ३१), गणेश मैंद (एक व तीन), प्रकाश निकम (चार व सहा), संदेश शिंदे (२१), राजेंद्र शिंदे (सोळा), अविनाश धनाईत (२०), नितीन पाटील (सात), संजय अग्रवाल (१५), डॉ. आवेश पालोड (१३),

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NMC
MTDC Fellowship : पर्यटन क्षेत्रात तरुणांना फेलोशिपची संधी! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

डॉ. अजिता साळुंखे (३०), डॉ. प्रशांत शेटे (आठ), डॉ. शैलेश लोंढे (२६), शैलेंद्र जाधव (नऊ), नितीन राजपूत (२९), जगन्नाथ कहाने (२७), राजेश पालवे (पाच), निलेश साळी (अठरा), अनिल गायकवाड (२५), जगदीश रत्नपारखी (२४).

स्वच्छ सर्वेक्षणात महत्त्वाचे

- ओला व सुका कचरा संकलन कचरा प्रक्रिया व विल्हेवाट
- घरापासून ते कचरा डेपोपर्यंत शंभर टक्के कचरा संकलन
- निवासी व व्यावसायिक क्षेत्र कचरामुक्त करणे
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता
- प्लास्टिक बंदी अमलात आणणे
- पावसाळी गटार योजना व पाण्याचे स्रोत असलेले ठिकाण अतिक्रमण मुक्त करणे
- शहरातील धूळ कमी करणे
- फुटपाथची दुरुस्ती करणे
- भिंती रंगविणे
- शहर सौंदर्यीकरण करणे

असे आहेत गुण

- सर्व्हीस लेव्हर प्रोग्राम : ४५२५
- सिटीझन व्हॉईस : २,४७५
- प्रमाणपत्र : २५००.

NMC
Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; या तारखेपर्यंत आहे संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com