नाशिक रोडकरांच्या जिव्हाळ्याचे असलेले सोमाणी उद्यानाचे आता सुशोभीकरण झाले आहे. मात्र उद्यानाबाहेरील अतिक्रमणामुळे नागरिक हैराण आहेत. तसेच उद्यानात ठिकठिकाणी बसविलेल्या ग्रीन जीमचीही दुरवस्था झाली आहे. .नाशिक रोड, जेल रोड, उपनगर परिसरात जे. डी. सोमाणी उद्यान, जेल रोडचे अमृत उद्यान, लोकमान्यनगर उद्यान ही मोठी उद्यांनांबरोबरच इतर ठिकाणी छोटे मोठी अशी १५० ते २०० उद्याने आहेत, त्यांपैकी ८० ते १०० उद्याने ही देखभालीसाठी काही संस्थांना दिली आहेत उर्वरित उद्यानांची देखभाल महापालिका करते. परंतु महापालिकेच्या देखभाल करीत असलेली उद्यानांची अवस्था फारच बिकट झाली आहे. काही उद्यानांत पाणी नाही, खेळणी तुटलेली, गाजर गवत वाढलेले, हिरवळ वाळलेली, बसण्याचे बाकडे तुटलेले, उद्यानामध्ये बनविलेल्या व्यासपीठांची दुरवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. वाढलेल्या गाजर गवतामुळे डास वाढले आहेत..संरक्षण भिंती तुटलेला आहेत. आता उन्हाळा सुरु झाल्याने सायंकाळी नागरिक उद्यानात गार हवेत उद्यानात फिरण्यासाठी व बसण्यासाठी येतात. परंतु तेथील दुरवस्थेमुळे ते तेथे थांबता येत नाही. नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या उद्यानांत बांधलेल्या समाज मंदिरांची दुरवस्था झाली आहे. दरवाजे खिडक्या तुटलेला आहेत. समाजमंदिरासाठी बांधलेल्या शौचालयांच्या टाकीचे स्लॅब तुटलेले आहेत. हौद उघडे असल्याने दुर्घटनेची भीती आहे.रात्री परिसरातील टवाळखोर मद्यपान करीत तेथेच घाण करून जातात. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. .उद्यानात टवाळखोरांचा सुळसुळाट झाला आहे. येथे येणाऱ्या महिलांची छेडछाड करत असल्याचे बोलले जाते. रहिवासी क्षेत्रात असलेला उद्यानांत परिसरातील रहिवाशांकडून कपडे वाळत घातले जातात. .टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, वाढलेले गाजरगवत काढावे, संरक्षण भिंत बांधाव्यात, परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, नागरी समितीमार्फत देखभाल करावी, खासगी संस्थांना देखभालीसाठी द्यावे, तुटलेल्या खेळणी बदलाव्यात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.