नाशिक- शहर व परिसरात तीन दिवसांपासून पावसाची शहर परिसर आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू आहे. यामुळे गोदावरीवरील गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जलसंपदा विभागाकडून धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर आल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा खळखळून वाहू लागला आहे.