पंचवटी - शाळा सुटली की आईला पोळी भाजीच्या केंद्रावर मदत आणि उरलेल्या वेळेत मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या अमृतधाम विडी कामगार येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ८३.२० टक्के गुण मिळविले आहे. त्याने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.