सोनगीरला 45 वर्षांनी भेटले मित्र मैत्रिणी

सोनगीरला 45 वर्षांनी भेटले मित्र मैत्रिणी
Published on: 
SGR26B07615 सोनगीर : ४५ वर्षानंतर भेटलेले मित्र. ---------- सोनगीरला ४५ वर्षांनी भेटले मित्र- मैत्रिणी एन. जी. बागूल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. २६ : येथील एन. जी. बागूल हायस्कूलमधील १९८०- ८१ च्या दहावीच्या वर्गातील मित्र- मैत्रिणींची तब्बल ४५ वर्षांनी भेट झाली. वयाची साठी उलटलेल्या मित्रांच्या जीवनातील संघर्ष, गमावलेल्या साथीदारांची आठवण व उर्वरित आयुष्यातील मैत्रीसाठी हे शालेय मित्र आपल्या विद्यालयात भेटले. कुठे ते शाळेतील मुक्त जीवन आणि कुठे आताचे हे संसाराचे पाश याची तुलना करताना भावविभोर झालेले सुमारे ३६ जण एकत्र आल्यावर किती आणि काय बोलू, अशी अवस्था झाली. १९८०- ८१ दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गुरूऋण व मैत्री ऋण व्यक्त करण्यासाठी स्नेहमेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एस. सी. जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक एच. व्ही. जोशी होते. सुमारे साडेचार दशकानंतर मित्र- मैत्रिणी भेटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य व भावूकता दिसून आली. सर्वच वेगवेगळ्या शहरात राहून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. उपस्थितांनी शाळा सोडल्यानंतरच्या जीवनातील कडू गोड आठवणी सांगितल्या. अनेक जण उच्च पदस्थ, कोणी उद्योजक तसेच प्रगतिशील शेतकरीही होते. एल. बी. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. शरद वाणी यांनी सूत्रसंचालन केले. युवराज सैंदाणे यांनी आभार मानले. हेमंत जैन, प्रशांत चिमठाणकर, के. पी. कासार, नलिनी धामणे आदींनी संयोजन केले. मेळाव्यास युवराज सैंदाणे, शरद वाणी, भानुदास बडगुजर, जुजर बोहरी, किशोर कासार, नलिनी धामणे, एल. बी. चौधरी, राजेंद्र केले, भुवनेश्वर तांबट, साधना पाटीदार, विजया महिरे, वसंत पाटील, हेमंत जैन, प्रशांत चिमठाणकर, सुनिता थोरात, रेखा पाटील, भगवान बडगुजर, साधना जोशी उषा मोरे साने, चंद्रकला वाणी, शफियोद्दीन पठाण, पल्लवी पटेल, शोभा (सपना) बडगुजर, प्रमिला कासार, पांडुरंग महाजन, लक्ष्मण सूर्यवंशी, उत्तमसिंग परदेशी, हंसराज शिसोदे, चित्रा कासार, अशोक जैन, निशिकांत कासार, राजेंद्र गोल्हार, दिलीप शिरोडे, दिनेश सोनार, किशोर पाटील, ज्ञानचंद्र जैन, राजेंद्र नांदेडकर, अविनाश कासार आदी उपस्थित होते. ------- कलाकारीने आणली रंगत सुरूची भोजनानंतर गप्पांच्या मैफलीत एल. बी. चौधरी यांचे ‘फिरकीवाली’, शरद वाणी यांचे ‘कुंकू घ्या कुणी काळं मणी’ हे भारूड तथा भगवान बडगुजर यांच्या नृत्याने मजा आणली. हिंदी, मराठी, गीते, भावगीत व विनोदी कार्यक्रमात दिवस कसा गेला कोणालाच समजले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com