सोनगीर येथे रात्रीत दोन घरफोडी

सोनगीर येथे रात्रीत दोन घरफोडी
Published on: 
सोनगीर येथे रात्रीत दोन घरफोडी सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ९ : येथील बालाजीनगर आणि लक्ष्मीनगर भागात दोन घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड सह एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालाजीनगरमधील दिनेश शांताराम पाटील (वय ५६) परिवारासह २ ऑक्टोबरला जगन्नाथपुरीला गेले होते. ८ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास ते परत आले असता, त्यांच्या घराच्या मुख्य लाकडी दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत दिसून आले. घरात बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून वस्तू अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. चोरट्यांनी ३० हजार रुपयांचे, १० ग्रॅम सोन्याची पोत, पाच हजार रुपयांची ३० भार चांदी (जोडवे व साखळ्या) आणि दहा हजार रुपये रोख, असा ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्याच रात्री लक्ष्मीनगरमधील अजय देवीदास पाटील यांच्या घरीही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. ते खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील १५ हजार रुपयांचे ५ ग्रॅम सोन्याचे कानातले, १५०० रुपयांची चांदीची साखळी व चैन आणि दहा हजार रुपये रोख, असा २६ हजार ५०० रुपयांची ऐवज चोरट्यांनी लंपास केला. बंद घरांची रेकी करून चोरी झाली. दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक सुरेश सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com