रथयात्रेत गावाच्या एकतेचे दर्शन

रथयात्रेत गावाच्या एकतेचे दर्शन
Published on: 
(पान ३ ला मेन) SGR26B07604 सोनगीर : येथील बालाजी मंदिराचा देखावा. ---------- सोनगीरच्या रथयात्रेत एकतेचे दर्शन देणगी जमा करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. २३ : गावाने ठरवले तर कुठलेही कार्य लिलया होते, हे येथील रथयात्रेत दिसून आले. रथयात्रेसाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे देणगी व मदत दिली. शेकडो हात मदतीसाठी पुढे आले. रात्री बाराच्या सुमारास रथयात्रा स्वस्थानी पोहचली. दरवर्षी दीड ते दोन लाख रुपये या दरम्यान देणगी जमा होते. यंदा अद्याप जमा रकमेची मोजणी बाकी आहे. रथयात्रेला सकाळपासूनच महिला बालाजी रथमार्गावर रांगोळी काढत होत्या. सुमारे दोनशे मीटर रांगोळीसाठी चारशे किलो विविध रंगाच्या रांगोळीचा वापर झाला. येथील वैशाली कासार, जयश्री कासार, राजबाला कासार, कुंदा कासार, तनुश्री कासार, शुभांगी निझर, संगीता सैंदाणे, रुचिका कासार, वृषाली नांदोडे, प्रगती शिंपी, भाग्यश्रीकासार, माधुरी कासार, प्रीती कासार, आकांक्षा कासार, भुमी कासार, खुशी कासार, जयश्री सैंदाणे यांनी विविध प्रकारच्या रांगोळी काढल्या. त्यांना विनोद कासार, मुकेश कासार, सागर कासार, गोपाल कासार, महेश कासार, रोहन कासार, वेदांत कासार, गोकुळ सैदाणे, दर्शन कासार, प्रसाद कासार, योगेश कासार, भूषण लोहार, प्रमोद शिंपी यांचे सहकार्य लाभले. अभिजित पाचपुते व सदस्यांनी संयोजन केले. शिवशक्ती ग्रुपने लिंबू सरबत व पाणपोई, मुस्लिम सोशल ग्रुप व विविध संस्थांनी पाणी व चहाचे स्टॉल लावून भाविकांची सेवा केली. मोगऱ्या बनविण्यासाठी लोहार समाजाने परिश्रम घेतले. संत सावता मित्रमंडळ, शिवशक्ती मंडळ, सावरकर मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, मोरया मंडळ, गुजर समाज मंडळ, नवयुवक मंडळ, पवनपुत्र मंडळ आदींनी वाजंत्रीचे काम सांभाळले. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी विशेष पोलिस पथकाची नियुक्ती केली होती. यात ३० पोलिस कर्मचारी व ६० होमगार्ड होते. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्याचे नियोजन केले. रात्री बाराला रथ स्वस्थानी पोहचला. त्यावेळी महाआरतीत हजारो भाविक सहभागी झाले. या वेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी अध्यक्ष सुभाष देवरे, बाळासाहेब भदाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, अविनाश महाजन, ज्ञानेश्‍वर चौधरी, पंकज कदम, आर. के. माळी, राजेंद्र महाजन, उद्योजक लखन रूपनर, मुरलीधर मोरे, अमित बागूल, रवीराज माळी, केदारेश्वर मोरे, राजेंद्र जाधव, पराग देशमुख, किशोर पावनकर, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी दर्शनाचा लाभ घेतला. --------- सामाजिक संस्थांकडून भाविकांची सेवा येथील बालाजी ग्रुपने रथाचे स्वागत एक भव्य पुष्पहार अर्पण करून रथाची शोभा वाढवली. तसेच, फ्लेक्सपासून बनवलेला तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा सादर केला. मठाधिपती मुकूंदराज महाराज यांच्या हस्ते देखाव्याचे उद्‌घाटन झाले. हजारो भाविकांनी बालाजींचे दर्शन घेतले. अष्टविनायक चौकात रथावर पुष्पवृष्टी व आतिषबाजी करण्यात आली. भक्तीगीतांवर तरूणाई थिरकली. मोगऱ्या लावण्यासाठी व रथ ओढण्यासाठी तरूणाई पुढे सरसावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com