सोनगीर 16 कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण करा

सोनगीर 16 कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण करा
Published on: 
(पान ३ ला मेन) SGR26B07535 सोनगीर : जलशुद्धीकरण केंद्राचे बंद पडलेले काम. -------- सोळा कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण करा पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर नागरीकांची मागणी सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ३ : संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जामफळ धरणाहून सोनगीरला पाणीपुरवठा होण्यासाठी १६ कोटींची योजना सुमारे ८० टक्के काम पूर्ण होऊन बंद पडली असून, ती सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा. तसेच, अन्य अडचणी दूर करून ३० हजार लोकसंख्येच्या जनतेचा पाणीप्रश्‍न सोडवावा, अशी मागणी होत आहे. ------- राज्य शासनाने टँकरमुक्त धोरण अवलंबिले असून, सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. येथे पुरेसा पाऊस न झाल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, महिन्यातून फक्त चार दिवस ते ही फक्त एक तास नळांना पाणी येते. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जलजीवन मिशन’अंतर्गत जामफळ धरणातून सुमारे १६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि शेवटच्या टप्प्यातील कामे थांबल्यानेे ही योजना अनेक महिन्यांपासून रखडली आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असताना योजना धुळ खात पडली आहे. योजनेतील झारीतील शुक्राचार्य कोण, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. पावसाळा संपताच पिण्याच्या पाण्याची ही स्थिती आहे. तर उन्हाळ्यात काय अवस्था असेल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दिरंगाईमुळे उशीर सोनगीरला सध्या जामफळ धरणातील दोन वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनेच्या सिंचन विहिरीतून पाणीपुरवठा होतो. जामफळ धरणाच्या विस्तारीत बुडीत क्षेत्रात सिंचन विहिरी जाणार असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हा पातळीवर संघर्ष व पाठपुरावा करून सुमारे १६ कोटींची योजना मंजूर करवून घेतली. त्यात जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी, उपसा विहीर, जलकुंभ व अन्य साहित्यांचा समावेश आहे. दररोज सुमारे २० लाख लिटर पाणी शुद्ध केले जाईल. सुरवातीला १६ कोटींची असलेली योजना दिरंगाईमुळे व काही वाढीव कामे झाल्याने योजनेचा खर्च १८ ते २० कोटीच्या घरात गेला. पूर्ण झालेली कामे सुवर्णगीरी किल्ल्याच्या पायथ्याशी साडेतीन लाख लिटर क्षमतेचा मुख्य जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, पंपगृह, जामफळ धरण परिसरातील जॅकवेल, सिंचन विहीर आणि ब्रिजचे चे काम पूर्ण झाले आहे. अपूर्ण कामे धरणातील जॅकवेल सिंचन विहिरीपासून गावातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे नऊ किलोमीटर जलवाहिनीपैकी सात किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित फक्त दोन किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. गावात काही भागात मोठ्या व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, तसेच धरण परिसरात असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील जमिनीतून मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळवणे, काही खाजगी शेतीमधून जलवाहिनी जाणार असल्याने सुमारे दोन किमी जलवाहिनीचे काम रखडले. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रापासून सुवर्णगीरी किल्ल्याच्या पायथ्याशी जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकणे आदी कामे बाकी आहेत. ------- तहान भागणे गरजेचे सोनगीरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ही योजना जीवनवाहिनी ठरणार आहे. परंतु, ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या समन्वयाअभावी योजनेचे काम लांबणीवर पडत आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्यापूर्वी उर्वरित जलवाहिनी आणि जलकुंभाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून सोनगीरकरांची तहान भागवणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन व प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com