Wedding Culture: जुन्या जाणत्या महिलांमुळे लग्नकार्यातील गाणी कायम! रूढी, परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर

Wedding Culture
Wedding Cultureesakal

Wedding Culture : विवाह समारंभ अत्याधुनिक युगात हायटेक झाला असले, तरी काही विधी, रुढी, परंपरांसाठी जुन्या पिढीतील गाणी हा अविभाज्य भाग आहे. विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील अस्मरणीय क्षण असून, तो आनंदात व विधीवत पूजेबरोबरच परंपरेनुसार गाणी गात साजरा केला जातो.

या गाण्यांसाठी जुन्या पिढीतील जाणकार महिलांची नितांत आवश्‍यकता आहे. कारण, त्यांच्याच आधारावर आजही या प्रथा सुरू आहेत. (songs of wedding function old women Customs and traditions on verge of extinction wedding culture nashik news)

नवीन पिढीतील महिला व तरुणींमध्ये मात्र ही गाणी शिकण्याबाबत अनास्था दिसून येते. त्यामुळे आगामी काळात विवाह समारंभांत या गाण्यांची उणीव भासण्याची चिन्हे दिसत आहेत. कसमादे पट्ट्यात अहिराणी भाषा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते.

या भाषेतील लग्न समारंभातील गाणी म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण सोहळा असतो. लग्नकार्याची सुरवात झाल्यापासून ते दोन दिवसांचा पुर्ण समारंभ आटोपेपर्यंत प्रत्येक विधीला अहिराणी गाणी आवर्जून म्हटली जातात.

आजच्या धावपळीच्या युगात गाणी गाणाऱ्या या महिलांची पिढी कुटुंबांतून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अनेक समारंभांत ही गाणी गाण्यासाठी जाणकार महिलांना ठरावीक बिदागी देऊन बोलविण्यात येते.

ही अहिराणी गाणी आता हळुहळु लुप्त होत असली, तरी ते ऐकण्याची उत्सुकता मात्र आजही आहे. मोबाईलच्या जमान्यातही अशा समारंभांमधून ही गाणी ऐकण्याची मजा आता वाढते आहे.

या विधीसाठी होतात गाणी

* बाजरी, तांदुळ निसवणे

* मांडव सुतविणे

* मांडवदारी नवीन चुल, सुप यांची पुजा

* वरमाईची (नवरदेवाची आई) सवाद्य मिरणूक

* हळद, काकण-पोयते, बाशिंग (मंडोळ्या) बांधतांना

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Wedding Culture
Success Story : एकाचवेळी सख्या बहिणींना खाकी वर्दी! दातलीच्या कडाळे भगीनींची भरारी

"लग्न समारंभात अहिराणी गाण्यांना आजही महत्व आहे. नवीन पिढीतील महिलांना या गाण्यांचे महत्व वाटत नसल्यामुळे काही गाणी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय, अशी शंका येते. नवीन पिढीने काही प्रमाणात अवलोकन केले, तरच महत्व टिकून राहिल. आवड असलेल्या महिलांनी ही गाणी शिकल्यास विवाह समारंभातील आनंद वाढीस लागेल."

-तुळसाबाई अहिरे, डांगसौदाणे, ता. बागलाण

काही गाणी अशी...

कोणगाव परणे जाशी रे मना माणिकडा (वर)

काय काय अंजने घेशील रे मना माणिकडा

----

आया फुकती, बाया फुकती

फुकती मामा, मावश्‍या....

----

पाच पानाचा ग विडा

वर मोतियाचा घोस...

Wedding Culture
Pocket Forest : सिन्नरमध्ये साकारणार पॉकेट फॉरेस्ट! वनप्रस्थच्या घनवन प्रकल्पाचे भूमिपूजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com