कळवणला साकारतोय अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक; 22 कोटी रुपये मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jogging track

कळवणला साकारतोय अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक; 22 कोटी रुपये मंजूर

कळवण (जि. नाशिक) : कळवण शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन कळवणकरांना अधिकाधिक आकर्षक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत (Nagar Panchayat) सातत्याने प्रयत्न करत असून, कळवणकरांच्या आरोग्याची काळजी म्हणून लवकरच उत्तर महाराष्ट्रातील सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक (Sophisticated jogging track) निर्माण होणार आहे. सद्यःस्थितीत जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे कळवण शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. (Sophisticated jogging track will going to build at kalvan 22 crore sanctioned Nashik News)

कळवण शहराच्या विकासासाठी आमदार नितीन पवार व नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली विविध कामे मार्गी लागत असून, नवनवीन नागरी सुविधांची निर्मिती केली जात आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शनी मंदिर ते संगमेश्‍वर महादेव मंदिरापर्यंत जॉगिंग ट्रॅक उभारणार असून, नावीन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत आमदार नितीन पवार यांच्या विशेष पाठपुराव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी केली असता या प्रकल्पासाठी २२ कोटी रुपये मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, शनी मंदिर ते बाजार पटांगण (एकलहरे रास्ता)पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

वैशिष्ट्ये
-आकर्षक प्रवेशद्वार
-अंदाजे ११०० मीटर लांबी
-ट्रॅक ब्रिकबॅटमध्ये बनवणार
-प्रस्तावित लांबीत दोन आकर्षक पुलांचा समावेश
-नदीच्या प्रवाहाने जमिनीची झीज होऊ नये यासाठी पूर्ण लांबीला सिमेंट काँक्रिटच्या भिंतींची तटबंदी-बाराही महिने नदीच्या प्रवाहात स्थिर पाणी राहील यासाठी बंधारे
-नदीलगतच्या बाजूस सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी बाकांची सोय
-संपूर्ण ट्रॅकच्या लांबीला उत्तम सावली, अधिकाधिक ऑक्सिजन उत्सर्ग करणारी झाडांची लागवड
-ट्रॅकवरून धावताना प्रसन्न वाटण्यासाठी रंगीबेरंगी झुडपांची सजावट
-वातावरणनिर्मितीसाठी वॅाटर प्रूफ म्युझिक सिस्टिम
-सतीमाता मंदिर व संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात योगासाठी चबुतरा
-संपूर्ण लांबीत तीन ठिकाणी सुलभ शौचालयांची सोय

हेही वाचा: अपघातात 3 जण ठार, ठेकेदारासह चालकावर गुन्हा दाखल करायची मागणी

"नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कळवणकरांनी माझ्यावर विश्‍वास ठेवून सत्ता दिली. त्यामुळे शहरात अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून, जॉगिंग ट्रॅकसारखे नावीन्यपूर्ण प्रकल्प आगामी काळात करण्यासाठी कटिबद्ध आहोत."
- नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा

"आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहराचा कायापालट करून जिल्ह्यात नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात विकासकामांच्या बाबतीत कळवण नगरपंचात रोल मॉडेल ठरेल, यासाठी प्रयत्नशील असून, विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार पवार यांनी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. " - कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण

"कळवण शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या विकासाप्रति असलेल्या अपेक्षा यातून कळवण शहरात विविध शहरी सुविधा निर्माण होत आहेत. येत्या काळात आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहराचे रूप अधिक आकर्षक आणि विकासाभिमुख असेल, यासाठी प्रयत्न करू." - भूषण पगार, युवानेते, कळवण

हेही वाचा: 'खेलो इंडिया' स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुकुंद आहेरला सुवर्णपदक

Web Title: Sophisticated Jogging Track Will Going To Build At Kalvan 22 Crore Sanctioned Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikNitin Pawar
go to top