
Nashik News : मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर-ताल-नृत्य
Nashik News : संगीताचा प्रचार आणि प्रसाराकरिता कार्य करणाऱ्या नाशिकमधील पवार तबला अकादमी, आदिताल तबला अकादमी, नृत्यानंद कथक नृत्य संस्था आणि सृजननाद इंडियन क्लासिकल आर्ट्स यांचे शिष्य मलेशिया येथे होणाऱ्या ‘अनुभूती’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. (sound rhythm dance of Nashik will resonate in Malaysia nashik news)
रविवारी (ता. २८) ते ४ जूनपर्यंत होत असलेल्या या संगीत दौऱ्यामध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमात हे सर्व कलाकार आपली कला सादर करत आहे.
मलेशियातील सेलांगोर येथील रामकृष्ण मिशन तसेच, क्वालालंपूर येथील लक्ष्मी नारायण मंदिर, टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स येथे कार्यक्रम होणार आहेत. प्रसिद्ध गायक डॉ. अविराज तायडे व पं. मकरंद हिंगणे गायन सादर करणार आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रसिद्ध तबला वादक नितीन पवार व त्यांचे शिष्य विराज मोडक, अथर्व शाळिग्राम, प्रसिद्ध तबला वादक नितीन वारे व त्यांचे शिष्य अंकुश रहाळकर हे सर्व तबला सहवादन सादर करणार आहेत.
कथक नृत्यांगना कीर्ती शुक्ल यांच्यासह त्यांच्या विद्यार्थिनी गार्गी पाटील, रुद्रा वालझाडे, मैत्रेयी गायधनी, देवश्री पाटील, अर्चना टोळ कथक नृत्य सादर करतील.
तसेच भरतनाट्यम नृत्यांगना शिल्पा देशमुख या व त्यांच्या शिष्या मुक्ता कुलकर्णी, इरा कुलकर्णी, रितिका जगताप, ऋचा देवरे आणि गायत्री हंडी या भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत.