Soybean Farming : निफाडमध्ये वाढणार सोयाबिनचे क्षेत्र! खरीप हंगामात 40 हजार हेक्टरवर होणार पेरणी

Soybean Farming
Soybean Farmingesakal

Soybean Farming : निफाड तालुक्यात गतवर्षापेक्षा यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा होण्याचा अंदाज असून त्यात सर्वाधिक २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होऊ शकते.

त्यासाठी आठ हजार क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. निफाड तालुक्यात २३ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. (Soybean area will increase in Niphad Sowing will done on 40 thousand hectares during Kharif season nashik agriculture news)

गतवर्षी पावसाने प्रारंभी दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. परिणामी ३५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होता. मात्र यंदा या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन ४० हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची पिके बहरण्याची शक्यता आहे.

खरिपाचा हंगाम जेमतेम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी सज्ज झाला आहे. सध्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान विभागाने ९६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने चांगला पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास पेरणी करता येणार आहे. शेतकऱ्यांचा कल यंदाही सोयाबीनकडेच अधिक राहण्याची चिन्ह आहे.

खरीप हंगामासाठी कृषी विभागानेही तयारी केली आहे. सोयाबीनची उगवण क्षमता, तपासणी, प्रात्यक्षिक, बियाण्यास बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

यासह खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची बी-बियाणे, रासायनिक खते कमी पडू नये यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांत रासायनिक खते, बि-बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Soybean Farming
Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून राऊत सरकारवर घसरले , १०० वर्षांपासूनची ती परंपरा...

खरीप पीकनिहाय उद्दिष्ट ः हेक्टरमध्ये

सोयाबीन ः २३ हजार ६७५.
मका ः ९ हजार ९१६.
भुईमूग ः ३९३
मूग ः १३३
कांदा ः ३०६

आवश्‍यक बियाणे (क्विंटलमध्ये)

सोयाबीन ः ६ हजार २१४ क्विंटल
मका ः १ हजार ९८३ क्विंटल
भुईमूग ः १३० क्विंटल

रासायनिक खते मागणी (मेट्रीक टनात)

युरिया ः १ हजार ३२०
डी.ए.पी. ः २ हजार ५७८
सुपर फॉस्फेट ः २ हजार ८४५
एमओपी ः ६०४

"निफाड तालुक्यात ४० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा अनुमान आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कोणतीही खते, बियाणे कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. खरीप हंगामातील पीकनिहाय मार्गदर्शन कृषी विभागाकडून केले जाणार आहे."

- खेडकर, तालुका कृषी अधिकारी, निफाड

Soybean Farming
Trimbakeshwar Temple Controversy : "उरुसाची परंपरा नक्कीच जुनी, मात्र..." तथ्य काय? इतिहास अभ्यासक म्हणतात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com