पिंपळगाव बसवंत- पाच वर्षांपूर्वी आठ हजार रुपयांपर्यंत गेलेले पिवळे सोने अर्थात सोयाबीनच्या बाजारभावात यंदा मोठी घसरगुंडी झाली आहे. शेतकऱ्यांचे पिवळे सोने यंदा काळवंडले असून, आठ वर्षांत प्रथमच बाजारभाव चार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या खाली गेले आहेत. यामुळे उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.