येवल्यात सोयाबीन सात हजारांवर; कांद्याला ४,२५१ रुपयांपर्यंत भाव! मुख्य बाजार आवारात कांद्याची दोन हजार क्विंटल आवक; बाजारभाव स्थिर

येवल्यात सोयाबीन सात हजारांवर; कांद्याला ४,२५१ रुपयांपर्यंत भाव! मुख्य बाजार आवारात कांद्याची दोन हजार क्विंटल आवक; बाजारभाव स्थिर
Published on: 
सेकंड मेन येवल्यात सोयाबीन सात हजारांवर; कांद्याला ४,२५१ रुपयांपर्यंत भाव! मुख्य बाजार आवारात कांद्याची दोन हजार क्विंटल आवक; बाजारभाव स्थिर सकाळ वृत्तसेवा येवला,ता.२४ : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या सर्वसाधारण भावाने सात हजार रुपयांचा टप्पा गाठला असून।कमाल ७,१०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दुसरीकडे,गावरान कांद्याला कमाल ४,२५१ रुपये, तर सर्वसाधारण ३,७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मुख्य बाजार आवारात कांद्याची अंदाजे दोन हजार क्विंटल आवक झाली. जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजारपेठांतील कांदा व सोयाबीनच्या दरांच्या तुलनेत येवल्यातील बाजारभाव टिकून असल्याने आवक वाढत आहे. बाजार समितीच्या मुख्य आवारात शनिवारी (ता. २४) सोयाबीनला किमान ५,१००, कमाल ७,१०१ आणि सर्वसाधारण ७,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सोयाबीनचा सर्वसाधारण दर सात हजारांवर स्थिरावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कांद्याच्या बाजारात किमान १,१००, कमाल ४,२५१ आणि सर्वसाधारण ३,७०० रुपये प्रतिक्विंटल दर नोंदविण्यात आला. दोन हजार क्विंटलच्या आसपास आवक झाल्याने कांद्याचे बाजार व्यवहार सुरू असल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या उपबाजार अंदरसूल येथे कांद्याला कमाल ३,७८१ आणि सर्वसाधारण ३,६५२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मक्याला मुख्य आवारात सर्वसाधारण २,४७० रुपये, तर अंदरसूल येथे २,५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मुख्य आवारात मक्याचा कमाल दर २,७६२ रुपये, तर अंदरसूल येथे २,७७८ रुपये होता. सोयाबीनला अंदरसूल येथे ६,९५० रुपये प्रतिक्विंटल दर नोंदविण्यात आला. डोंगरगाव उपबाजारात आठवडे बाजारानिमित्त लिलाव बंद होते. गहू, बाजरी आणि मुगाचेही व्यवहार मुख्य बाजार आवारात झाले. गव्हाला सर्वसाधारण ३,००० रुपये, बाजरीला २,४०० रुपये आणि मुगाला ६,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृतपणे शेतमाल बाजार समितीतच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरनारे आणि सचिव के. आर. व्यापारे यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com