संदीप विद्यापीठतर्फे २०३० मध्ये उपग्रह प्रक्षेपण

संदीप विद्यापीठतर्फे २०३० मध्ये उपग्रह प्रक्षेपण
Published on: 
NSK26H33963 नाशिक ः संदीप विद्यापीठात आयोजित ‘स्‍पेस ऑन व्‍हील्स’ प्रदर्शनाच्‍या उद्घाटनप्रसंगी डॉ. संदीप झा, इस्रोचे शास्त्रज्ञ रवीकुमार वर्मा यांच्‍यासह मान्‍यवर. ---------------- संदीप विद्यापीठातर्फे २०३० मध्ये उपग्रह प्रक्षेपण डॉ. संदीप झा ः इस्‍त्रोच्‍या सहकार्याने स्‍पेस ऑन व्‍हील्‍स प्रदर्शनानिमित्त घोषणा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ः संदीप विद्यापीठाच्‍या माध्यमातून २०३० या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांच्‍या नेतृत्‍वाखाली व इस्रोच्या सहकार्य व मार्गदर्शनातून उपग्रहाचे (सॅटेलाईट) प्रक्षेपण करण्याचा प्रयत्‍न असेल. याद्वारे कृषी, दळणवळण, जीपीएस, सायबर सुरक्षा, भूजलपातळी, भूगोलिय बदल आदींची माहिती मिळण्यास सहाय्यता होणार असल्‍याची माहिती संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ---------- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) ‘विक्रम साराभाई स्पेस एक्जीबिशन’ म्हणजेच ‘स्पेस ऑन व्हील्स’ प्रदर्शनाचे संदीप विद्यापीठात आयोजन केले आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता.२९) झाले. यानिमित्त पत्रकार परिषदेत डॉ. झा बोलत होते. इस्रोचे शास्त्रज्ञ रवीकुमार वर्मा उपस्‍थित होते. डॉ. झा म्‍हणाले, की संदीप विद्यापीठाच्‍या एरोनॉटिक्‍स व एरोस्‍पेस अभियांत्रिकी शाखांच्‍या प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्‍यक्ष कामाचा अनुभव मिळावा, याअनुषंगाने विविध सामंजस्‍य करार केले जात आहेत. याचाच एक भाग म्‍हणून इस्‍त्रोसोबत सामंजस्‍य करार केला जाणार आहे. याद्वारे २०३० मध्ये विद्यार्थ्यांच्‍या माध्यमातून उपग्रहण प्रक्षेपण केले जाईल. विद्यापीठ प्रांगणात आयोजित प्रदर्शन सर्वच विद्यार्थ्यांसाठी शनिवार (ता.३१) पर्यंत खुले आहे. अधिकाधिक शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्‍यांनी केले. १६-१ चौकट वैज्ञानिक कुतूहलाला चालना प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि नाशिकमधील नागरिकांना अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान, प्रक्षेपण याने आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ''स्पेस ऑन व्हील्स'' प्रदर्शनाचा मुख्य उद्देश भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील यशाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. या प्रदर्शनाद्वारे अभ्यागतांना इस्रोचे उपग्रह उपयोजन, अंतराळ संशोधन, प्रक्षेपण यान तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय विकासामधील योगदान यांविषयी माहिती घेता येईल. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कुतूहलाला चालना देऊन त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रांत करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.