वंचित विद्यार्थ्यांसाठी अकरावीची विशेष फेरी घ्या

वंचित विद्यार्थ्यांसाठी अकरावीची विशेष फेरी घ्या
Published on: 
वंचित विद्यार्थ्यांसाठी अकरावीची विशेष फेरी घ्या खासदार भास्कर भगरे यांची शालेय शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत विशेष प्रवेश फेरी राबवावी, अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्‍हटले आहे, की अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मतदारसंघातील अनेक विद्यार्थी विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, तांत्रिक सुविधांची कमतरता, तसेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पालक व विद्यार्थ्यांकडून प्राप्त तक्रारींचा उल्लेख करत खासदार भगरे यांनी या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून, केवळ तांत्रिक किंवा ऑनलाइन अडचणींमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून वंचित सर्व विद्यार्थ्यांसाठी तत्काळ किमान एक विशेष प्रवेश फेरी सुरू करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यापुढे प्रवेश प्रक्रियेमध्ये एखादा विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील, याची जाणीव ठेवून योग्य ती कार्यवाही करावी, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.