Nashik News: कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये विशेष अर्थसहाय्य अनुदान द्या; आमदार डॉ. राहुल आहेर

MLA Rahul Aher & Devendra Fadanvis
MLA Rahul Aher & Devendra Fadanvisesakal

चांदवड (जि. नाशिक) : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल किमान पाचशे रुपये विशेष अर्थसहाय्य अनुदान द्यावे अशी मागणी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Special financial subsidy of Rs 500 per quintal for onion MLA Dr Rahul Aher demand letter to devendra fadanvis Nashik News)

नाशिक जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने कांदा उत्पादक आहे. सध्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव ५०० ते ७०० रु. प्रती क्विंटल आहे. भरघोस उत्पादन, वाढलेली साठवण क्षमता, काही परदेशी बाजार पेठांमध्ये बिघडलेली आर्थिक स्थिती, रशिया- युक्रेन युद्ध असे काही कारणे ह्या साठी प्रामुख्याने जबाबदार आहेत.

केंद्र व राज्य सरकार नेहमीच कांदा उत्पादक शेतक-याला मदत करण्यासाठी निर्यात धोरण, नाफेड कांदा खरेदी व ईतर मार्ग अवलंबत असते. पण तरी सध्यस्थिती मध्ये बाजारपेठेत कांदाभाव अत्यंत कमी आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

MLA Rahul Aher & Devendra Fadanvis
Sahyadri Farms Ultra Marathon : ‘सह्याद्री'तर्फे मोहाडीमध्ये रविवारी अल्ट्रा मॅरॅथॉन

कमी असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अशा स्थिती मध्ये शेतक-यांना ५०० रु. प्रती क्विंटल आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा असे वाटते.

तसेच केंद्र सरकार कडून अजून उपाययोजना करून कांदा बाजारभाव वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

MLA Rahul Aher & Devendra Fadanvis
Success Story: देशातील पहिली हायब्रीड रॉकेट मोहीम यशस्वी; महिरावणी विद्यालयाच्या मुलींची गगनभरारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com