नाशिक : पोलिस दलाकडून 2 दिवसात 400 जणांवर कारवाई | Latest Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

पोलिस दलाकडून 2 दिवसात 400 जणांवर कारवाई

नाशिक : पोलिस दलाकडून दोन दिवसांमध्ये परिमंडळ एकमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 404 जणांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पोलिसांकडून पायी गस्त घालण्यावर विशेष जोर दिला जात आहे.

शहरात दीड महिन्यापासून गुन्हेगारीवर डोके वर काढले आहे. मागील 2दिवसामध्ये किरकोळ कारणावरून 7 खून झाले आहे. यातच 35 हून अधिक सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरी, अपहरण, धारदार शस्त्राने वार करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील परिमंडळ एक अंतर्गत पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून दोन दिवसांपासून प्रत्येक पथकाच्या मदतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. या पथकांमध्ये एक अधिकारी व सात अंमलदार असून, ते पोलिस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग, कोम्बिंग, अवैध दारू विक्री, टवाळखोर, अवैध जुगार खेळणाऱ्यांस रेकॉर्डवरील, तडीपार आणि हिस्टरी शिटर यांचा कसून शोध घेत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेमध्ये ४०४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: 25 मिनिटात दुचाकी केली लंपास

शनिवारी (ता. ४) केलेल्या कारवाईमध्ये अवैध दारू विक्री करणारे (२), अवैध जुगार (१) गुन्ह्यातील संशयित (५), बेकायदेशीर हत्यार (२), घरफोडी संशयित (२९), तडीपार (२७), टवाळखोर (११३), रात्री सुरू असलेल्या आस्थापना (१२) अशा २१८ कारवाई करण्यात आल्या. रविवारी (ता. ५) ही मोहीम राबविण्यात आली. यात ३५ तडीपार, ८३ टवाळखोर, रेकॉर्डवरील (१४), हिस्टरी शिटर (२०) असे एकूण १८६ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या सात व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयास्पद फिरणाऱ्या एकाविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Web Title: Special Operation By The Police Due To Crime Increase In Nashik 404 People Were Arrested In 2 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikpoliceArrested
go to top