Dasara Diwali Special Railway : दसरा, दिवाळीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या

railway
railwayesakal
Updated on

Dasara Diwali Special Railway : दसरा, दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३० विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, रेल्वेच्या महसुलात दरवर्षीप्रमाणे ‘छप्पर फाडके’ वाढ होणार आहे. मुंबई सीएसटी- नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट गाडीच्या (गाडी क्र. ०२१३९) २० फेऱ्या होतील. (Special trains on occasion of Dussehra Diwali nashik news)

मुंबईहून ही गाडी १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान सोमवार आणि गुरुवारी ००.२० ला सुटेल. नागपूरहून ही गाडी (क्र. ०२१४०) २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी १३.३० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० ला मुंबईला पोहोचेल.

दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे ही गाडी थांबेल.

railway
Central Railway : मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार आणखी एक नवीन उपनगरीय लोकल स्थानक

गाडीला वातानुकूलित इकॉनॉमी क्लासचे १६ डबे असतील. नागपूर-पुणे सुपरफास्ट गाडीच्या दहा फेऱ्या होतील.

ही गाडी (क्र. ०२१४४) १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी १९.४० ला नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ ला पुणे येथे पोहोचेल; तर पुण्याहून ही गाडी २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी १६.१० ला सुटेल.

भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आदी ठिकाणी ही गाडी थांबेल. वातानुकूलित इकॉनॉमी क्लासचे १६ डबे गाडीला असेल. या गाड्यांसाठी बुकिंग सर्व प्रवासी आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

railway
Diwali Holidays : विद्यार्थ्यांना दिवाळीत मिळणार २० दिवस सुटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com