
Nashik News : नाशिक-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवणे त्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, अंडरपासच्या कामांना वेग देणे अशा तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अडथळेविहीन करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याच्या सूत्रांनी दिली.
‘सकाळ’ने ‘महामार्गाची वाताहत’ या वृत्तमालिकेद्वारे या महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्षवेध केला होता. खात्याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) रस्त्याची डागडुजी करून तो सुस्थितीत आणण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनाही गुणवत्तापूर्ण कामाबाबत सूचना देऊन कार्यवाही चालवली आहे. (Speed up repair of Nashik Mumbai highway)