नाशिक- शहरासह उपनगर परिसरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आयुक्तालय हद्दीतून तब्बल सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून दिवसरात्र गस्तीवर पथके असतानाही दुचाकींची चोरी होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे..गौरव शिवाजी बाविस्कर (रा. मथुरा अपार्टमेंट, धात्रक फाटा, नाशिक) याची ४० हजारांची दुचाकी (एमएच १९ इएल २१३२) १९ तारखेला मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तर, प्रतीक संजय बेडसे (रा. साक्री, जि. धुळे) याची ६ हजारांची दुचाकी (एमएच १८ क्यु ८९४६) १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०२४ या दरम्यान पंचवटीतील संत सावता माळीनगर येथील अग्निशमन विभाग कार्यालयामागे पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. उपेन विजयकुमार खरबंदा (रा. अनुप सोसायटी, जेल रोड) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीई ७३९९) शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री मेळा बसस्थानकाच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. .तर अक्षय सुधाकर साळवे (रा. शांतासुमन बंगला, पवार मळा, पेठ रोड) याची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीजे १०३४) १९ तारखेला रात्री गंगावाडी येथील तुळजा भवानी मंदिराशेजारून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. राहुल शरद सोनवणे (रा. सावरकरनगर, नाशिक) याची ४० हजारांची दुचाकी (एमएच ४१ एडब्ल्यु ७५५६) सावरकर नगरमधील सुमन अपार्टमेंट येथे पार्क केली असता, शनिवारी (ता. २२) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. गोकुळ रूपचंद चौरे (रा. शिवशक्तीनगर, जेल रोड) यांची १५ हजारांची दुचाकी (एमएच १५ इआर ०५७५) शनिवारी (ता. २२) दुपारी साडेचार ते पाच या दरम्यान राहत्या घरासमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.