संक्षिप्त पट्टा पान तीन

संक्षिप्त पट्टा पान तीन
Published on: 
संक्षिप्त पट्टा पान तीन ---- ''नमामि म्हणजे समर्पित भाव’ जळगाव : चातुर्मासाच्या पवित्र कालखंडात स्वाध्याय भवनाच्या प्रांगणात नियमित प्रवचनमाला सुरू आहे. यावेळी प्रखर वक्ते, तत्त्वचिंतक प्रमोद मुनी महाराज यांनी उपस्थितांना ''नमामि आणि खामेमि'' याबद्दल माहिती दिली. श्रद्धाळूंन संबोधित करताना प्रमोद मुनी महाराज म्हणाले की, आत्मशुद्धी, अहंकाराचा नाश, करुणेची भावना व्यक्त करणारे दोन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक शब्द म्हणजे ''नमामि आणि खामेमि'' होय. ''नमामि'' म्हणजे विनम्रतेने नमन करणे किंवा नतमस्तक होण्याचा समर्पित भाव होय. जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला ''नमामि'' म्हणते, तेव्हा ती आपल्या अंतर्मनातील अहंकाराचा त्याग करीत असते. जीवनात विनयशीलता आणि नम्रतेचा भाव असणे, मानवाला सामाजिक, कौटुंबिक तसेच व्यावहारिक जीवनात सन्मान मिळवून देते. ---- पाल, सातपुड्याकडे पर्यटकांचा ओढा जळगाव : पाल (ता. रावेर) येथे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये गारबर्डी धरणाच्या काठावर वन विभागाने पर्यटकांसाठी फारबर कुटी अन् वन्य प्राण्यांना न्यायाळण्यासाठी व पक्षी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारले आहेत. त्यास प्रतिसादही मिळाला आहे. वृक्ष, वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण प्रेमी, पर्यटक या भागात हजेरी लावत आहेत. जिल्ह्यातील पाल इको टुरिझमला गती देण्याचे काम वन्यजीव वन विभागाने हाती घेतले आहे. पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद मिळणार आहे. ---- NSK26H34032 : भगवान भटकर भगवान भटकर यांच्या काव्यसंग्रहांचे आज प्रकाशन जळगाव : ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहासह ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता.१) आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात सकाळी अकराला कार्यक्रम होईल.‘ कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक व कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. रफिक काझी ‘राही’ यांच्या हस्ते होईल. या सोहळ्यास मु. जे. महाविद्यालयाचे प्रा. देवेंद्र इंगळे अध्यक्षस्थानी असतील. तर अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी यांची प्रमुख उपस्थिती असेल. ---- चंद्रकांत मोरे यांचा आजपासून सत्संग जळगाव : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे चंद्रकांत मोरे हे १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या ३ दिवसांत त्यांचा जिल्ह्यातील १७ केंद्रांवर सत्संग होणार आहे. रविवारी (ता. १) सकाळी १० वाजता चाळीसगाव येथील हिरापूर रोड केंद्रास भेट देऊन चंद्रकांत मोरे यांच्या दौऱ्यास प्रारंभ होईल. २ रोजी चंद्रकांत मोरे जळगाव शहरातील १६ सेवा केंद्रांना भेटी देत भाविकांशी संवाद साधतील, यात इंद्रनील सोसायटी, कल्याणी नगर, निवृत्ती नगर, मयूर कॉलनी, मुकुंद नगर, शास्त्री नगर, शिव कॉलनी, आनंद नगर, गुरुकुल कॉलनी, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, अयोध्या नगर, जानकी नगर, कांचन नगर, गुरुदत्त कॉलनी आणि सायंकाळी ७ वाजता प्रताप नगर केंद्राचा समावेश आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.