नामपूर महाविद्यालय यश

नामपूर महाविद्यालय यश
Published on: 
10147 नामपूर : सृजनरंग सांस्कृतिक स्पर्धेतील नामपूर महाविद्यालयाचे विजेते विद्यार्थी. सृजनरंग जिल्हास्तरीय स्पर्धेत नामपूर महाविद्यालयाचे यश सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. २३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जिल्हास्तरीय ‘सृजनरंग सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धेत’ महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय सृजनरंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून निफाड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वरचित काव्यलेखन, काव्यवाचन, निबंध लेखन, वक्तृत्व, भित्तीचित्र, पोवाडागायन, पथनाट्य अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. सदर स्पर्धेत महाविद्यालयातील स्वरचित हिंदी काव्यवाचन जान्हवी अहिरे (द्वितीय), मराठी निबंध लेखन स्पर्धा प्रिती भामरे (तृतीय), तसेच पथनाट्यात तृतीय क्रमांक मिळविला. पथनाट्य संघात संघात जान्हवी अहिरे, प्रीती भामरे, स्नेहल कोर, पायल पगारे, प्रियांका अहिरे, साक्षी कोर, निकिता शिंदे, कोमल सोनवणे यांचा समावेश होत. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. बी. कदम, उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. युवराज भामरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. हर्षल बच्छाव आदींचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com