SSC Exam 2023: दहावीच्‍या परीक्षेचा उद्यापासून श्रीगणेशा; जिल्ह्यात 91 हजार 580 विद्यार्थी जाणार सामोरे

SSC Exam 2023
SSC Exam 2023esakal

नाशिक : करिअरच्‍या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा समजल्‍या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्‍या लेखी परीक्षांना सुरवात होत आहे. गुरुवारी (ता.२) प्रथम भाषा या विषयाच्‍या पेपरने मार्च २०२३ च्‍या परीक्षेला सुरवात होईल.

या परीक्षेला जिल्ह्या‍तून ९१ हजार ५८० विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. दरम्‍यान परीक्षेच्‍या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची लगबग बघायला मिळत असून, अनेकांकडून विषयाच्‍या उजळणीला अधिकाधिक वेळ दिला जातो आहे. (SSC Exam 10th exam from tomorrow 91 thousand 580 students will face in district nashik news)

गेल्‍या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे परीक्षा पद्धती प्रभावित झालेली होती. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली असताना पूर्वीप्रमाणेच परीक्षांचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे यंदा संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जात असून, लिखाणासाठी जादाचा वेळदेखील देण्यात आलेला नाही.

गुरुवार (ता.२) पासून दहावीची लेखी परीक्षा सुरु होत असून, २५ मार्चपर्यंत विविध विषयांचे लेखी पेपर पार पडतील. दरम्‍यान पहिला पेपर प्रथम भाषा विषयाचा आहे. सकाळच्‍या सत्रात सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मराठीसह हिंदी, उर्दू, गुजराथी व अन्‍य प्रादेशिक भाषांचे पेपर होतील.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

SSC Exam 2023
Nashik News : NMC आयुक्तांविरोधात BJP मैदानात; माजी नगरसेवकांनी दिला ‘जबाब दो’ आंदोलनाचा ईशारा

दुपारच्‍या सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत जर्मन आणि फ्रेंच या भाषेचे पेपर होणार आहेत. शुक्रवारी (ता.३) द्वितीय व तृतीय भाषा विषयांचे पेपर घेतले जातील.

नाशिक विभागाची स्‍थिती अशी-

जिल्‍हा विद्यार्थी संख्या

नाशिक---------९१ हजार ५८०

जळगाव---------५६ हजार ८१७

धुळे-------------२८ हजार ४१०

नंदुरबार---------२० हजार ३४१

SSC Exam 2023
MNS News : ‘मनसे’ची नव्याने बांधणी; अमित ठाकरे यांचे संकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com