Maharashtra Board SSC exam
sakal
नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉलतिकिटे) मंगळवार (ता. २०) पासून शाळांमार्फत उपलब्ध होणार आहेत. याबाबत शिक्षण मंडळाने शाळांसाठी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.