esakal | SSC Online Result : विद्यार्थ्यांना मिळणार विषयनिहाय गुणांची प्रत
sakal

बोलून बातमी शोधा

online result

SSC Online Result : विषयनिहाय गुणांची प्रत मिळणार

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे २०२१ मध्ये नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल शुक्रवारी (ता. १६) दुपारी एकला ऑनलाइन जाहीर होईल. विषयनिहाय संपादित केलेल्या गुणांची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. मंडळाच्या http://result.mh-ssc.ac.in आणि www.mahahsccboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्र निकाल उपलब्ध होईल. (SSC-Online-Result- get-copy-subject-wise-marks-marathi-news-jpd93)

विषयनिहाय गुणांची प्रत मिळणार
दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. सरकारने निश्‍चित केलेल्या मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे शाळांनी विषयनिहाय गुण दिले आहेत. त्याप्रमाणे मंडळाने निकाल तयार केला आहे. २८ मे २०२१ च्या सरकारच्या निर्णयातील तरतुदीनुसार २०२१ च्या दहावीच्या परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी दोन संधीमध्ये परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक ते दोन संधी उपलब्ध राहतील.

loading image