मालेगाव शहर- बापाच्या कष्टाला यशाची जोड देऊन लेकी संघर्षातून यशस्वी होतात. अशाच ‘वडापाव’ विकणाऱ्या बापाची लेक समृद्धी संदीप शिंदे हिने दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळविले. सबस्टेशन परिसरातील रहिवासी असलेले संदीप शिंदे दौलती शाळेच्या परिसरात वडापावचा गाडा लावून संसाराचा गाडा हाकतात.