(टीप – सदरची बातमी जाहिरातदार संस्थेची आहे. कृपया फोटोसह प्रसिध्दी करावी ही विनंती)
SNR26B23074
वडझिरे ः तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत यश मिळविलेला कातकाडे विद्यालयाचे संघ.
३०-२
एसएसके पब्लिक स्कूलला
तालुका क्रिकेटचे विजेतेपद
-----------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१३ ः जिल्हा क्रीडा कार्यालय, सिन्नर तालुका क्रीडा समितीतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत वडझिरे येथील एसएसके पब्लिक स्कूल ॲंड कनिष्ठ महाविद्यालयाने नेत्रदीपक यश मिळविले. विद्यालयाच्या मुला व मुलींचे दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले.
१४ वर्षाआतील मुलांचा, १७ वर्षाआतील मुलांचा व १७ वर्षाआतील मुलींचा तसेच १९ वर्षाआतील मुलांचा व मुलींचा अशा पाचही संघांनी प्रथम क्रमांक मिळविला. या यशाचे तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातून स्वागत केले जात आहे. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका आदींनी खेळाडूंचा गौरव केला. विद्यालयात वर्षभर विविध स्पर्धांसाठी तयारी करुन घेतली जाते. त्यामुळे या शाळेने क्रीडा क्षेत्रात आपले नाव अग्रभागी ठेवले आहे. क्रिकेटचा संघ दरवर्षी प्रथम क्रमांकाने बाजी मारत आले आहेत. जिल्हा, विभागीय स्तरावरही विद्यालयाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यंदाही हीच परंपरा राखली जात असल्याने धनलक्ष्मी पतंसस्थेच्या मार्गदर्शिका कुसुम कातकाडे, अध्यक्ष संग्राम कातकाडे यांनीही या यशाचे स्वागत केले आहे.
-------------