(टीप – सदरची बातमी जाहिरातदार संस्थेची आहे.कृपया फोटोसह वापरावी ही विनंती)
फोटो-23314
ब्राह्मणवाडे ः एसएसके महाविद्यालयाचा विभागीय क्रिकेट स्पर्धेत यश मिळविणारा संघ.
विभागीय क्रिकेट स्पर्धेत
एसएसके स्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १ ः क्रीडा संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या विभागीय शाळेय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील एसएसके पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षांखालील संघाने विजेतेपद पटकावले.
विभागीय स्पर्धेत संघाने नाशिक ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करत हे यश मिळवले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका आदींनी खेळाडूंचा गौरव केला. संघाने धुळे महापालिका, जळगाव महापालिका आणि धुळे ग्रामीण संघांना पराभूत केले.
एसएसके स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १४ वर्षांखालील मुलांचा, १७ वर्षांखालील मुलांचा व १७ वर्षांखालील मुलींचा तसेच १९ वर्षांखालील मुले- मुली अशा पाचही संघांनी यापूर्वी तालुकास्तरापासून विविध स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. क्रिकेटचा संघ दर वर्षी बाजी मारत असून, यंदाही हीच परंपरा राखली जात असल्याने धनलक्ष्मी पतंसस्थेच्या मार्गदर्शिका कुसुम कातकाडे, अध्यक्ष संग्राम कातकाडे यांनीही या यशाचे स्वागत केले.
.......