
नाशिक : पुन्हा ८९ कर्मचारी पुन्हा निलंबित; लासलगावला एसटी फोडली
नाशिक : विलगीकरणासाठी मागील २३ दिवसांपासून संपावर असलेला कर्मचाऱ्यांचा संप मंगळवारी(ता.३०) देखील सुरुच राहिला. एसटी प्रशासनाकडून मंगळवारी तब्बल ८९ नियमित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यावेळी नाशिक विभागात आतापर्यंत ३९५ कर्मचारी निलंबित झालेले आहे. लासलगाव आगारातून पोलिस बंदोबस्तात ३ एसटी रवाना झाल्या. यात एका बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली.
शासकीय सेवेत जोपर्यंत विलगीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आजही कायम ठेवली. लासलगाव डेपो वगळता जिल्ह्यातील एसटीची प्रवासी वाहतूक ठप्पच राहिली. वेतनवाढीने कर्मचाऱ्यांचे समाधान न झाल्याने व संप मागे घेतला जात नसल्याने एसटी प्रशासनाकडून दररोज निलंबनाची कारवाई केली जात आहे. मंगळवारी देखील ही कारवाई झाली. यावेळी जिल्ह्यातील ८९ नियमित कर्मचारी यांना कामवार रुजू न झाल्याने निलंबित करण्यात आलेले आहे.
हेही वाचा: नाशिक महापालिका निवडणुकीवर 'ओमिक्रॉन'चे सावट
लासलगावला बस फोडली
लासलगाव डेपोतून प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी बस सोडल्या जात आहे. सोमवारी (ता.२९) दोन तर मंगळवारी (ता.३०) तीन बस चांदवड, चांदोरी व निफाड मार्गावर धावल्या. परंतु यातील एका बसची तोडफोड करण्यात आली.
हेही वाचा: रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स
Web Title: St Administration On Tuesday Suspended 89 Regular Employees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..