कळवणच्या बातमीला जोडून घ्यावी. किंवा शेजारी लावावी
एसटी कर्मचाऱ्यांचा सटाण्यात घंटानाद
------------------------------
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. ४ : येथील बस आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी घंटानाद आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसह महामंडळाच्या धोरणात्मक निर्णयांविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे सटाणा आगारात घंटानाद आंदोलन झाले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ५ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.
कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी भेट आणि १२ हजार ५०० रुपये सणउचल तातडीने द्यावी, २०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी अदा करावी, २०१८ पासूनचा महागाई भत्त्याचा फरक मिळावा, तसेच जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता आणि स्थानिक पूरक भत्त्याची थकबाकीही तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
आजपासून धरणे
संघटनेचे अध्यक्ष शशिकांत बिरारी, सचिव नितीन बोरसे, विभागीय संघटक सचिव जे. डी. खैरनार यांच्यासह कारभारी सोनवणे, अमोल भामरे, जैनुद्दीन पटेल, गणेश देवरे, सुनील देवरे, पी. डी. जाधव, एस. डी. खैरे, सचिन पगार, भूषण आहेर, दर्शन आहेर, अझर काजी, सुनील पवार, सुभाष गोसावी, डी. एच. राजकुवर, दिनेश रौंदळ, बी. एम. वाघ, कल्पना बागुल, नलिनी गायकवाड, अलका कोळी आदी कर्मचारी उपस्थित होते. उद्या ५ नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.