उपनगर- दसक- पंचक, जेल रोड भागामध्ये डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक सध्या स्वयंस्फूर्तीने गोवऱ्याचा धूर करून डासांना पळवून लावत आहे. नाशिक महापालिकेने डासांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलेले दिसत असून दसक नदीकिनारी पाणवेलींचा विळखा सध्या डासांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरत आहे.