(बातमी आवश्यक)
--
NSK26H34879
जळगाव : रायसोनी महाविद्यालयात इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेलतर्फे आयोजित केलेल्या प्री-इन्क्युबेशन उपक्रमात सहभागी विद्यार्थी.
------
रायसोनी महाविद्यालयात
प्री-इन्क्युबेशन कार्यक्रम
उपशिर्षक
‘स्टार्टअप’च्या दिशेने विद्यार्थ्यांची वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१२ : विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना उद्योजकतेची दिशा देऊन त्यांचे यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने रायसोनी महाविद्यालयात इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेलतर्फे प्री-इन्क्युबेशन उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संकल्पनांचे व्यावसायिक स्वरूपात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.
या उपक्रमामध्ये आयडिया व्हॅलिडेशन, डिझाइन थिंकिंग, बिझनेस मॉडेल डेव्हलपमेंट, प्रोटोटाइप निर्मिती, मार्केट रिसर्च, स्टार्टअपचे कायदेशीर पैलू, कंपनी नोंदणी, फंडिंग आणि स्टार्टअप रेडीनेस अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. केवळ सैद्धांतिक माहितीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपक्रम, प्रात्यक्षिके, तज्ज्ञांशी संवाद आणि मेंटॉरिंगच्या माध्यमातून स्टार्टअप उभारणीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हिमांशू दास, हिमानी कांकरिया, प्राची लाड, यांच्यासह महाविद्यालयाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. मुकुंद पाटील, इन्क्युबेशन विभागप्रमुख प्रा. हुतेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनेची उपयुक्तता तपासणे, बाजारपेठेची गरज ओळखणे, प्रभावी व्यावसायिक मॉडेल तयार करणे आणि प्रत्यक्ष उत्पादन किंवा सेवा विकसित करण्याच्या प्रक्रियेची ओळख झाली.
------