आसामचे राज्यफूल ‘सीतेची वेणी’ नाशिकच्या हरसूलमध्ये बहरले!

fox tailed orchid
fox tailed orchidesakal
Updated on

नाशिक : हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) परिसरातील जंगलातील दुर्मिळ होत चाललेली अन्‌ आसामचे राज्यफूल ‘सीतेची वेणी’ बहरली आहे. फुलातील मध चाखण्यासाठी पक्षी, फुलपाखरे अन्‌ कीटकांची वर्दळ वाढली आहे. सीतेच्या वेणीला फॉक्सटेल ऑर्किड म्हणून ओळखले जाते. दंडगोलाकृती माळलेल्या फुलाचा गजरा कधी वरच्या बाजूला थोडा फुगीर आणि खाली निमुळता होत जातो. तेव्हा कोल्ह्याच्या केसाळ शेपटीची आठवण होते. (state-flower-of-Assam-fox-Tailed-Orchid-blossomed-in-Harsul-marathi-news-jpd93)

मध चाखण्यासाठी पक्षी-फुलपाखरे अन् कीटकांची वाढली वर्दळ

वनस्पतींची फुले एखाद्या घोसाप्रमाणे दिसतात. एका घोसात १०० पेक्षा जास्त गुलाबी ठिपके असलेली पांढऱ्या रंगाची फुले असतात. फुलोरा हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरवातीला येतो. ही वनस्पती जंगलात अथवा जंगलाच्या सीमेवर ३०० ते दीड हजार मीटर उंचीवर वृक्षांच्या खोडांवर उगवणारे एक बांडगूळ आहे. देशात ही वनस्पती ईशान्य भारत, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात अधिक आढळते. रॅन्कोस्टायलिस रेटुसा ही वनस्पती अरुणाचल प्रदेश आणि आसाम प्रांताचे राज्यफूल म्हणून ओळखले जाते.

आसामी विवाह सोहळ्यामध्ये महत्त्वाचे स्थान

आसाममध्ये ही वनस्पती कोपौ फूल म्हणून लोकप्रिय आहे. ते नर्तकांच्या पोशाखांचा अविभाज्य भाग असतो. फुलांना पारंपरिक आसामी विवाह सोहळ्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. सीतेची वेणी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे आणि तिच्या फुलांच्या सौंदर्यामुळे अनेक पर्यटक ही वनस्पती जंगलातून थेट आपल्या बागेत लावतात.

ऑर्किडविषयी थोडे

मोठ्या झाडांवर वाढणाऱ्या ऑर्किडबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. मुख्यतः ऑर्किड बांडगूळ आहे, असा समज आहे. ऑर्किड दुसऱ्या झाडांवरच वाढतात असे नाही. ती जमिनीतून, दगडातून, पालापाचोळ्यातूनही येतात. त्यांना आपली मुळे रोवण्यासाठी छोट्या जागेची गरज असते. झाडावर वाढणारी ऑर्किड ‘एपीकाइट’ या वर्गात मोडतात. म्हणजे ती फक्त आधारासाठी दुसऱ्या मोठ्या झाडाचा वापर करतात. या झाडाच्या खाचांमध्ये एकदा का त्यांची मुळे घट्ट बसली, की हवेतील बाष्प आणि प्राणवायू घेऊन ती वाढीला लागतात. स्वत:चे अन्न ते स्वत:च बनवितात.

fox tailed orchid
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला; दगड फेकत दहशत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com