नाशिक- विशेष बाब म्हणून महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर असताना शासनाने तिसरे अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली. शासनाने हिचं भूमिका महापालिकेचा आकृतिबंध व बिंदूनामावली मंजुरी बाबत का नाही? असा सवाल उपस्थित करताना शिवसेना (उबाठा) उपनेते व म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नऊ हजार पदांच्या आकृतिबंधाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे.