Nashik News: रिंगरोडसाठी राज्य शासनाने माहिती मागविली; सिंहस्थाच्या कामाला वेग

Ring Road File Photo
Ring Road File Photoesakal

Nashik News : शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता तसेच आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडे रिंगरोडसाठी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाने महापालिकेकडून सविस्तर माहिती मागविली आहे.

त्यानुसार किती शिवार व क्षेत्र बाधित होईल, त्याचबरोबर किती चौरस मीटर क्षेत्र रिंगरोडसाठी लागणार आहे, याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामाला वेग आला आहे.

तर दुसरीकडे शहराच्या बाह्य भागाला स्पर्श होणारे रिंगरोड वाहतुकीचा भार हलका करण्यास उपयुक्त ठरणार आहे. (State Govt seeks information for Ring Road Speed ​​up Simhastha work Nashik News)

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडे महापालिका व ‘एनएमआरडीए’ कडून रिंगरोडची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नाशिक रोड येथील प्रादेशिक नगररचना संचालक कार्यालयाकडे माहिती मागवली आहे.

त्या कार्यालयाकडून महापालिकेकडे सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. महापालिका हद्दीच्या बाह्य भागाला स्पर्श करणारे दोन रिंगरोड तयार केले जाणार आहे. त्यात पहिला रिंगरोड २६ किलोमीटर व दुसरा रिंगरोड ३० किलोमीटर, असा एकूण ५६ किलोमीटरचे दोन रिंगरोड तयार केले जाणार आहे.

जवळपास २६ लाख चौरस मीटर जागा रिंगरोडसाठी लागणार असून, भूसंपादनाच्या बदल्यात प्रोत्साहनपर टीडीआर दिला जाण्याची शक्यता आहे. तो टीडीआर एकास तीन या पद्धतीने राहणार असून, २६ लाख चौरस मीटर जागेचा विचार केल्यास ७२ लाख चौरस मीटर जागेसाठी टीडीआर द्यावा लागेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असा असेल रिंगरोड

६० मीटरचा एक रिंगरोड, तर ३६ मीटरचा दुसरा रिंगरोड असेल. ६० मीटरचा रिंगरोड विल्होळी शिवार, पाथर्डी शिवार, वालदेवी नदीला समांतर, पिंपळगाव खांबपासून विहीतगाव शहरात नाशिक- पुणे महामार्ग ओलांडून पंचक, माडसांगवी शिवार, पुढे आडगाव शिवार तसेच ट्रक टर्मिनसच्या बाजूने महामार्गाला मिळेल.

तर साठ मीटरचा रिंगरोड आडगाव ट्रक टर्मिनस समोरून सुरू होईल. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, महापालिका हद्दीला लागून असलेल्या जलालपूर शिवार, बारदान फाटा, गंगापूर रोड, गंगापूर उजवा तट कालवा पुढे त्र्यंबक रोडपर्यंत जाईल. त्यापुढे अंबड औद्योगिक वसाहतीतून गरवारे पॉइंट येथे महामार्गाला हा रिंगरोड मिळेल.

"नाशिक रोड येथील प्रादेशिक नगररचना कार्यालयाला पंधरा दिवसात रिंगरोड संदर्भातील अहवाल सादर केला जाईल. यात रिंगरोडचा नकाशा तयार करणे, शिवारनिहाय बाधित होणारे क्षेत्र व सद्यःस्थितीत ताब्यात असलेले क्षेत्र आदी माहिती दिली जाईल."

- हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com