राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत श्रॉफच्या खेळाडूंचे यश

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत श्रॉफच्या खेळाडूंचे यश
Published on: 
33230 नंदुरबार : यशस्वी खेळाडूंसोबत प्रशांत बागुल, भिकू त्रिवेदी, सीमा पाटील आदी. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत श्रॉफ विद्यालयाचे यश नंदुरबार, ता. २२ : खेळातील मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परभणी येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या या स्पर्धेत खुशी चव्हाण हिने रौप्य, तर अनुष्का चौधरी हिने कांस्यपदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. महाराष्ट्रातील आठ विभाग आणि क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत विविध वजनगटांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. त्यात खुशी चव्हाण हिने ४६ ते ४८ किलो वजनगटात रौप्यपदक पटकावले. अनुष्का चौधरी हिने ५४ ते ५७ किलो वजनगटात कांस्यपदक मिळवले. नीरज देवरे आणि मधुसूदन मराठे यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला. अकोला येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी रितेश ज्ञानेश्वर पाटील याची निवड झाली आहे. या खेळाडूंना जगदीश वंजारी, मनीष सनेर आणि हेमचंद्र मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करत संस्थेच्या समन्वयक सुषमा शाह, मुख्याध्यापक प्रशांत बागुल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील आणि पर्यवेक्षक सुनील शाह, नितीन देवरे, विमलेश बागुल यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com