Nashik : राज्याचे पोलिस इंटेलिजेन्स ब्युरोच ठरले ‘फेल्युअर’

Intelligence Bureau
Intelligence Bureauesakal

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्र पोलिस दल (Maharashtra Police Force) अनेक स्तरांवर ‘फेल’ ठरल्याचे दिसून आले. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोरच पोलिस दलातील उणिवांचे वाभाडे काढले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली तरीही, ‘फेल्युअर’चा ठपका काही महाराष्ट्र पोलिसांचा पुसता आला नाही. परिणामी, संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनाही गुंगारा देण्यात राज्याचा गृह राज्यमंत्री व मंत्री-आमदार यशस्वी झाले. याचा ना त्या संरक्षणासाठी पोलिसांना थांगपत्ता लागला, ना महाराष्ट्र पोलिसांच्या इंटेलिजेन्स ब्युरोला (Intelligence Bureau) खबर लागली. त्यामुळे स्कॉटलंड पोलिसांशी नेहमीच होणारी महाराष्ट्र पोलिसांची तुलना खरीच मानावी का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. (State Police Intelligence Bureau declared failure eknath shinde rebellion maharashtra political news)

राज्याचे गृहराज्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना कंमाडो दर्जाची सुरक्षारक्षक आहेत. तर, शिवसेनेचे बंडखोर मंत्री, आमदारांना एक, दोन वा त्यापेक्षा अधिक पोलिसांचे सुरक्षाकवच असते, जे २४ बाय ७ त्यांच्या समवेत असतात. त्यामुळे मंत्री, आमदारांच्या ज्या-ज्याठिकाणी वावर असतो, त्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून पोलिस असतातच. यामुळे या सर्वांच्या हालचालीचा तपशील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना सहज उपलब्ध होत असतो. याशिवाय, महाराष्ट्र पोलिस दलात राज्यगुप्त वार्ता विभाग व अन्य गोपनीय विभाग कार्यरत असून, शेकडो अधिकारी, कर्मचारी यात सदैव कार्यरत असतात.

अशी सारी यंत्रणा पूर्वीपासून आहे. आता तर डिजीटीलायझेशनमुळे पोलिसांचा गोपनीय विभाग अधिक सक्षम असायला हवा होता. परंतु, तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र पोलिसांचा हाच गोपनीय विभाग अनेक आघाड्यांवर-प्रकरणांमध्ये फेल्युअर ठरल्याचे वारंवार दिसून आलेले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी राज्यावर सध्या ओढावलेल्या परिस्थितीला महाराष्ट्र पोलिसांचा गोपनीय विभागाच जबाबदार असल्याची चर्चा याच पोलीस वर्तुळात आहे.

जारीतला शुक्राचार्य शोधा?
स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एका गटाने बंडखोरी करीत मुंबईतून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या गोपनीय विभागाने ही माहिती तात्काळ स्व. देशमुख यांना दिली. त्यानंतर बंडखोरी करून पलायनाच्या तयारी असलेल्या तत्कालिन आमदारांना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्या बंडखोरांचे बंड तर शमलेच, शिवाय सरकारवरचे संकटही टळले होते. असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत परंतु पोलिसांच्या गोपनीय विभागाच्या सतर्कमुळे अशी बंडखोरी सरकारांना उधळून लावण्यात यश आले होते. मात्र, सध्याच्या महाराष्ट्र पोलिसांचा गोपनीय विभाग सतत ‘फेल’ का ठरतोय, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली असून, यामागे जारीतला शुक्राचार्य कोण याचा शोध घेण्याची हीच वेळ असल्याचीही चर्चा वरिष्ठ पोलीस अधिकार्यांमध्ये होत आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा व्यक्त केली नाराजी
गेल्या दोन-अडीच वर्षातील अनेक घटनांसंदर्भात पोलिसांना आलेल्या अपयशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करताना गोपनीय विभागाचे वाभाडे काढले आहेत. गृहखाते राष्ट्रवादीकडे असले तरी खात्याच्या मंत्र्यांपर्यंतच गोपनीय माहिती न पोहोचविणे, तसेच पोलीस दलातील असमन्वयाबाबत श्री. पवार यांनी पोलिस अधिकार्यांचे पिसेही काढले आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र पोलिस दलाच्या कामकाजात कोणतीही सुधारणा न झाल्याचेच सध्याच्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे.

Intelligence Bureau
भुसावळ-नाशिक पुणे रेल्वे 'या' तारखेपासून सुरू होणार

कारवाई होणार का?
सध्याच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र पोलिसांतील गोपनीय विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे बंडखोरी केलेल्या गृहराज्यमंत्र्यांसह मंत्री व आमदारांकडे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचारी, या कर्मचांर्याकडून माहिती घेणारे अधिकारी आणि ती माहिती गोपनीय शाखेला न पोहोचणार्या अशा सार्यांवर कारवाई होणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Intelligence Bureau
ई - कचऱ्याच्या रूपाने नाशिककरांसमोर मोठे संकट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com