Nashik News : वाहकांच्या आडमुठेपणाने दिव्यांगांना मनस्ताप

State Transport Corporation
State Transport Corporationesakal

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये दिव्यांगांना प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठी केंद्राकडून वैश्‍विक क्रमांक (युडीआयडी) असलेले कार्ड देण्यात आलेले आहे. महामंडळाकडूनही सवलत प्रवासाचे कार्ड देण्यात आलेले आहे. त्या कार्डवर युडीआयडी क्रमांक असतानाही वाहकांकडून (कंडक्टर) ते नाकारले जात असल्याने दिव्यांगांना प्रवासादरम्यान मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

विशेषत: शासनाने काही दिवसांपूर्वीच दिव्यांगांच्या याचसंदर्भातील तक्रारींची दखल घेत युडीआयडी क्रमांक असलेले कार्ड ग्राह्य धरण्याबाबत परिपत्रक जारी केले. तरीही वाहकच परिपत्रकाचे पालन करताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे दिव्यांगांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो आहे. (State transport corporation bus Even with the UDID number on card it is rejected by carriers and Conductor so disabled people face problem in Journey Nashik News)

State Transport Corporation
NMC Tax Recovery : पन्नास हजारांच्या पुढील थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजणार!

यापूर्वी दिव्यांगांना प्रवासादरम्यान वैदयकीय प्रमाणपत्रांसह विविध कागदपत्रे बाळगावे लागत असे. त्यातून सुटका करण्यासाठी त्यांना युडीआयडी क्रमांक देण्यात आला. त्याच कार्डची माहिती राज्य परिवहन महामंडळाकडे सवलतीचे कार्ड काढताना देण्यात आलेले असते. त्यानुसार महामंडळांचेही कार्ड दिव्यांगांना देण्यात आलेले आहे. दिव्यांगांच्या क्षमतेच्या टक्केवारीनुसार त्यांना प्रवासी तिकिटात सवलत वा त्यांच्यासमवेत असलेल्या व्यक्तीलाही तिकिटात सवलत दिली जाते.

असे असताना, वाहकांकडून दिव्यांगांबाबत आडमुठ्ठेपणाची भूमिका घेतली जात आहे. बहुतांशी दिव्यांग हे युडीआयडी वा एसटी महामहामंडळाचे कार्ड यापैकी एकच स्वत:समवेत बाळगतात. दोन्ही कार्डवर युडीआयडी कार्डचा क्रमांक असतो. तरीही काही वाहकांकडून दोन्ही कार्ड वा पूर्वीप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी करीत दिव्यांगांना प्रवासापासून रोखण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना ऐनप्रवासात मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. परिणामी कार्ड असूनही त्यास महामंडळाचे वाहक ते नाकारत असल्याने दिव्यांगांमध्ये याबाबत रोष आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

State Transport Corporation
Nashik News : हायड्रोलिक शिडीसह यांत्रिकी झाडू खरेदीची चौकशी; शासनाने मागविला अहवाल

महाव्यवस्थापकांकडे तक्रारी

परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडे राज्यभरातून दिव्यांगांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल महमंडळाने घेतली आणि त्यासंदर्भातील परिपत्रकच जारी केले. या परिपत्रकानुसार, दिव्यांगांकडे असलेले युडीआयडी कार्ड प्रवास सवलतीसाठी कार्ड ग्राह्य धरावे, असा स्पष्ट उल्लेख असून तसे आदेश राज्यातील विभाग नियंत्रक, आगार प्रमुखांना देण्यात आलेले आहे. असे असतानाही वाहकांकडून (कंडक्टर) या परिपत्रकातील आदेशाचे पालन होताना दिसत नाही.

"दिव्यांगांच्या युडीआयडी कार्ड प्रवासासाठी ग्राह्य धरण्याबाबत वारंवार वाहकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचना फलकांवर परिपत्रकही लावण्यात आलेले आहे. एकाही दिव्यांगांला प्रवासात त्रास होणार नाही याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणी परिपत्रकाचे उल्लंघन करीत असेल तर कारवाई केली जाईल."

- अरुणा सिया, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, नाशिक

State Transport Corporation
SAKAL Exclusive : राजकीय अडथळ्यांमुळे रस्ते विकास रखडला! अरुंद रस्त्यांवर वाडे कोसळण्याची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com