VIDEO : सावत्र आईने मुकबधीर लेकराला दिले गुप्तांगावर चटके; फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stepmother beats child

सावत्र आईने मुकबधीर लेकराला दिले गुप्तांगावर चटके

नाशिक : क्रूरपणाचा कळसच बोलावा लागेल अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात निळवंडे पाडे गावात घडली आहे. सावत्र आईने निष्पाप मूकबधिर मुलाच्या गुप्तांगावर चटके दिल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. या घटनेचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. (stepmother-beat-child-nashik-marathi-news)

सावत्र आईचा अमानुष प्रकार; नागरिकांमध्ये संताप

माय मरो पण मावशी जगो.. अशी म्हण प्रचलित जरी असली तरी सावत्र आई बनून आलेल्या मावशीने मुकबधीर असलेल्या लहान लेकरावर अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले आहे, सख्खी आई सोडून गेल्यानंतर मावशी ही आईप्रमाणेच सांभाळ करेन हा विश्वास पार धुळीला मिसळवत या मुलावर या क्रूर मातेने अक्षरश: नात्याला काळीमा फासणारे अत्याचार केले आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याच्या सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली आहे. बालकाच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केले आहेत. ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्या लहान मुलाला दिंडोरी येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

पोलिसांची घटनेची दखल घेत कारवाई

सावत्र आई ही त्या मुलाची मावशी आहे. कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असूनही हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Stepmother Beat Child Dindori Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimechild abuse
go to top