जुने नाशिक- पोलिसांवर झालेल्या दगडफेकीची घटना दुर्दैवी आहे. हिंसेचे मी समर्थन करीत नाही; परंतु पोलिसांनी एकतर्फी कारवाई न करता शहरात अशा प्रकारे वादाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई करावी. भडक वक्तव्य करून तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी मंगळवारी (ता. २२) येथे पत्रकार परिषदेत केली.